Gold Rate 11 May 2024
Gold Silver Price HikeSaam TV

Gold Silver Price Hike : सोन्याचे दर सत्तरी पार; वाचा आज मुंबई पुण्यातील किंमती

Gold Rate 11 May 2024 : आज पुन्हा सोन्याच्या दरांत प्रति तोळा किरकोळ अशी १० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आजचे २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दर जाणून घेणार आहोत.
Published on

काल अक्षय्य तृतीयनिमित्त नागरिकांनी सोनाराच्या दुकानात मोठी गर्दी केली होती. सोन्याचे दर वाढल्याने नागरिक खरेदीसाठी थोडा विचार करतील अशी शक्यता होती. मात्र काल तब्बल १२०० किलो सोन्याची उलाढाल झाल्याचं समजलं आहे. तसेच आज सोन्याचे दर सत्तरी पार झालेत. ऐन लग्न सराइत सोन्याचा भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना जस्तीचे पैसे मोजावे लागतायत.

Gold Rate 11 May 2024
Today's Gold Silver Rate : सोन्याचे दर पुन्हा कडाडले, चांदीही महागली; मुंबई-पुण्यातील आजचा भाव काय?

अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी देखील सोन्याच्या दरांत वाढ झालीये. आज पुन्हा सोन्याच्या दरांत प्रति तोळा किरकोळ अशी १० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आजचे २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दर जाणून घेणार आहोत.

आज २४ कॅरेट सोन्याचा भाव

२४ कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत आज १० रुपयांनी वाढली असून आजचा भाव ७३,८५० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याच्या किंमती देखील वाढल्यात. २२ कॅरेट प्रति तोळा सोन्याची किंमत ६७,७१० रुपये प्रति तोळा आहे आणि १८ कॅरेट प्रति तोळा सोन्याची किंमत ५५,४०० रुपये प्रति तोळा आहे.

महत्वाच्या शहरांमधील किंमती

चेन्नईत आज २२ कॅटेक सोनं ६७,७१० रुपये प्रति तोळा आहे.

मुंबईत २२ कॅटेक सोनं ६७, ५६० रुपये प्रति तोळा आहे.

पुण्यामध्ये २२ कॅटेक सोनं ६७, ५६० रुपये प्रति तोळा आहे.

नवी दिल्लीत २२ कॅटेक सोनं ६७, ७१० रुपये प्रति तोळा आहे.

कोलकत्तामध्ये २२ कॅटेक सोनं ६७, ५६० रुपये प्रति तोळा आहे.

आजच्या चांदीच्या किंमती

आज प्रति किलो चांदीचे दर १०० रुपयांनी वाढलेत. चांदी प्रति किलो ८७,८०० रुपये आहे. मुंबईत चांदीची किंमत ८७,८०० रुपये आहे. तर पुण्यातही चांदी प्रति किलो ८७,८०० रुपये विकली जात आहे.

Gold Rate 11 May 2024
Gold Smuggling : मुंबई विमानतळावर गुदद्वार, अंतर्वस्त्रातून सोने तस्करी; कस्टम विभागाकडून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com