Today's Gold Silver Rate : सोन्याचे दर पुन्हा कडाडले, चांदीही महागली; मुंबई-पुण्यातील आजचा भाव काय?

(2nd May 2024) Gold Silver Price In Maharashtra: २ मे २०२४ रोजी सोन्यासह चांदीच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. आज भारतात सोन्याच्या किंमती ७६० रुपयांनी वाढल्या आहेत.
Today's Gold Silver Rate
Today's Gold Silver RateSaam TV

सलग तीन दिवस सोने-चांदीच्या किंमती घसरल्या होत्या. मात्र आज २ मे २०२४ रोजी सोन्यासह चांदीच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. आज भारतात सोन्याच्या किंमती ७६० रुपयांनी वाढल्या आहेत. आता पुढचे काही दिवस भाव चढते राहू शकतात अशी शक्यता आहे.

Today's Gold Silver Rate
Today's Gold Silver Rate : लग्नसराईत ग्राहकांना दिलासा! सोन्याच्या भावात घसरण, चांदीची चकाकी उतरली; जाणून घ्या मुंबईसह इतर शहरातील दर

२४ कॅरेट सोन्याची किंमत

आज २४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,४२० रुपये प्रति तोळा आहे. काल ७१,६६० रुपये प्रति तोळाने सोनं विकलं जात होतं. आज २४ कॅरेट मागे ७६० रुपयांची वाढ झाली आहे. १०० ग्राम सोन्याच्या किंमतीत ७,६०० रुपयांनी वाढ झाली असून आजचा भाव ७,२४,२०० रुपये आहे.

(24 carat gold price)

२२ कॅरेट सोन्याची किंमत

२२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एक तोळा सोन्याची किंमत ६६.४०० रुपयांवर पोहचली आहे. काल एक तोळा सोनं ६५,७०० रुपयांना विकलं गेलं. तसेच १०० ग्राम सोन्याच्या किंमतीत ७००० रुपयांनी वाढ झालीये. त्यामुळे आज १०० ग्राम सोन्याची किंमत ६,६४,००० रुपये इतकी आहे. (22 carat gold price)

मुख्य शहरांमधील सोन्याचे दर

चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ६७,१५० रुपये प्रति तोळा तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७३.२५० रुपये प्रति तोळा आहे. मुंबईमध्ये आज २२ कॅरेट सोनं ६६,२५० प्रति तोळा आहे, तर २४ कॅरेट सोनं ७२,२७० रुपये प्रति तोळ्याने विकलं जात आहे. नवी दिल्लीत २२ कॅरेट ६६,४०० आणि २४ कॅरेट ७२,४२० कॅरेट प्रति तोळा विकलं जात आहे. कोलकत्तामध्ये २२ आणि २४ कॅरेट सोनं ६६,२५० आणि ७२,२७० रुपये प्रति तोळा आहे. (Gold rates in cities)

चांदीच्या किंमतीत वाढ

चांदीच्या किंमती देखील आज वाढल्या आहेत. तब्बल ५०० रुपयांची वाढ प्रति किलो मागे झाली आहे. काल चांदी ८३,००० किलोने होती. आज ८३,५०० रुपये किलो भाव आहे. मुंबईत ८३,५०० किलो, चेन्नईत ८७,००० किलो, नवी दिल्लीमध्ये ८३,५०० किलो, कोलकत्तामध्ये ८३,५०० किलो चांदीचा दर आहे. (A rise in the price of silver)

Today's Gold Silver Rate
Oommen Chandy Passes Away: केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचे निधन, वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com