एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. मार्च महिन्यापासून सोन्या-चांदीच्या दरात उसळी पाहायला मिळाली.
मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यात सोन्याचा भाव हा ६८ हजारांवर होता. त्यानंतर सोन्याच्या भावाने ७५ हजारांचा आकडा ओलांडला. तर चांदीच्या दरातही भरमसाठ वाढ झालेली पाहायला मिळाली होती.
अमेरिकेतील बँकांच्या खराब स्थितीमुळे सोन्याच्या भावात प्रचंड वाढ होताना दिसून आली आहे. सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी नोंदवले आहे. लग्नसराईत सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रासह मुंबई-पुण्यातील आजचे भाव
गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,६७० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७२,७५० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ३३० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८४००० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात कोणतीही वाढ झालेली पाहायला मिळाली नाही.
२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)
मुंबई (Gold Rate in Mumbai) - ७२,६०० रुपये
पुणे (Gold Price in Pune) - ७२,६०० रुपये
नागपूर (Gold Rate in Nagpur) - ७२,६०० रुपये
नाशिक(Gold Price in Nashik) - ७२,६३० रुपये
ठाणे (Gold Rate in Thane) - ७२,६०० रुपये
अमरावती (Gold Price in Amravati) - ७२,६०० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.