Oommen Chandy Passes Away: केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचे निधन, वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kerala Congress: ओमन चांडी हे दोन वेळा केरळचे मुख्यमंत्री राहिले आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ते ओखळले जात होते.
Oommen Chandy Passes Away
Oommen Chandy Passes AwaySaam Tv

Congress Leader Oommen Chandy: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Congress Leader) आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी (Oommen Chandy Passes Away) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन आणि ओमन चांडी यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी त्यांच्या निधनाची माहिती दिली. ओमन चांडी हे दोन वेळा केरळचे मुख्यमंत्री राहिले आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ते ओखळले जात होते.

Oommen Chandy Passes Away
Bengaluru Opposition Meeting: उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा, बंगळुरूत मोठी खलबतं

ओमन चांडी यांच्या मुलाने त्यांच्या निधनाबाबत फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली. त्याने सांगितले की, 'आप्पा यांचे बंगळुरु येथे निधन झाले आहे.' ओमन चांडी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर बंगळुरू येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. ओमन चांडी हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये (Bharat Jodo Yatra) देखील सहभागी झाले होते. त्यांच्या निधनामुळे केरळमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Oommen Chandy Passes Away
Deepak Kesarkar: धक्कादायक! मंत्री दीपक केसरकर यांना धमकी; खंडणीही उकळण्याचा प्रयत्न

केरळ काँग्रेसने देखील यासंदर्भात ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'आमचे सर्वात प्रिय नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांना निरोप देताना खूप दु:ख होत आहे. ते केरळमधील सर्वात लोकप्रिय आणि गतिशील नेत्यांपैकी एक होते. चांडीसरांवर सर्व जण प्रेम करत होते. काँग्रेस परिवाराला त्यांच्या नेतृत्वाची आणि उर्जेची उणीव नेहमी भासेल.'

Oommen Chandy Passes Away
NDA Meeting: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज; आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत PM मोदी मार्गदर्शन करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करून ओमन चांडी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदींनी ट्वीटमध्ये असे लिहिले की, 'ओमन चांडी यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. आपले जीवन जनसेवेसाठी समर्पित करणारा आणि केरळच्या प्रगतीसाठी काम करणारा नम्र आणि समर्पित नेता आपण गमावला. मला त्यांच्याशी झालेल्या विविध संवादांची आठवण आहे. विशेषत: जेव्हा आम्ही दोघांनी आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि नंतर मी दिल्लीला गेलो तेव्हा. या दु:खाच्या वेळी त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांसोबत मी आहे. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com