Deepak Kesarkar News: मंत्री दीपक केसरकर यांना धमकी आल्याचा प्रकार समोर आला आहे. थेट मंत्री दीपक केसरकर यांना धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने मंत्री दीपक केसरकरांकडून खंडणीही उकळण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रदीप भालेकरला अटक केली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी प्रदीप भालेकर याने मंत्री केसरकर यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीला ४५ हजार रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी कार्यालयातील व्यक्तीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्रदीप भालेकरला पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, दीपक केसरकर यांनी देखील प्रदीप केसरकरला आर्थिक मदत केली होती. काही दिवसानंतर केसरकरांनी मदत देण्यास थांबविली, त्यानंतर प्रदीप भालेकर तुमची माहिती उघड करतो, अशी धमकी देत होता. अशी माहिती तक्रारीत आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राजकीय नेत्यांना धमकी मिळण्याचे प्रकार वाढले आहे. याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, मंत्री धनंजय मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री छगन भुजबळ यांनाही धमकी मिळाली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काही दिवसांपूर्वी धमकीचा फोन आला होता. अफसर पाशा याने मंत्री गडकरी यांना धमकी दिली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील रागामुळे मंत्री गडकरी यांना धमकीचा फोन केला असल्याचं अफसर पाशाने पोलिसांना सांगितलं.
अफसर पाशा याला काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दहशतवादी जाळ पसरविण्यासाठी २००३-०४ मध्ये नागपुरात वास्तव्याला होता. नागपुरात राहत असताना काही लोकांच्या भेटी देखील घेतल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.