Petrol diesel Rate today: US-इराण युद्धाच्या भडक्याचा थेट खिशावर परिणाम? कच्च्या तेलाचे भाव कडाडले; तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर पाहा

Petrol price today: अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र भारतात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात अद्याप कोणताही बदल झालेला नाही. प्रमुख शहरांतील आजचे इंधन दर आणि तेलबाजारातील ताज्या घडामोडी जाणून घ्या.
petrol diesel price
petrol diesel price Saam Tv
Published On

मध्य पूर्वेतील नव्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झालीये. सोमवारी 13 जुलै रोजी अमेरिका आणि इराण यांच्यात नव्याने झालेल्या लष्करी हल्ल्यांनंतर तेलाच्या दरात झपाट्याने वाढ झाली. याचबरोबर जगातील महत्त्वाच्या ऊर्जा वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'च्या स्थितीबाबत दोन्ही देशांनी परस्परविरोधी दावे केले आहेत.

मात्र, भारतात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ऑइल मार्केटिंग कंपन्या (OMCs) आणि नैसर्गिक वायू वितरण कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाच्या किमती अद्ययावत करतात.

petrol diesel price
Gold Rate Today: सोनं-चांदी महागली! सोनं ३००० तर चांदींच्या दरात ८००० रुपयांनी वाढ; वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर

भारतात पेट्रोल-डिझेलचे दर सध्या स्थिर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले असले तरी देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सध्या कोणताही बदल झालेला नाही. मात्र, गेल्या काही महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एकूण सुमारे 8 रुपयांनी प्रति लिटर वाढ झाली आहे.

petrol diesel price
Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 14200 रुपयांनी स्वस्त; 18K- 22K आणि 24K चे आजचे दर किती?

प्रमुख शहरांमधील आजचा दर

आज देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये काही प्रमाणात फरक पाहायला मिळत आहे. नवी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ₹102.12 असून डिझेल ₹95.20 प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल ₹113.51 आणि डिझेल ₹99.82 प्रति लिटर दराने विकलं जातंय. मुंबईत पेट्रोलचा दर ₹111.21 तर डिझेलचा दर ₹97.83 प्रति लिटर असून नोएडामध्ये पेट्रोल ₹101.96 आणि डिझेल ₹95.44 प्रति लिटर आहे. गुरुग्राममध्ये पेट्रोल ₹102.97 तर डिझेल ₹95.64 प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. बेंगळुरूमध्ये पेट्रोल ₹111.68 आणि डिझेल ₹99.56 प्रति लिटर आहे.

देशातील प्रमुख शहरांतील सीएनजीचे दर (प्रति किलो)

  • नवी दिल्ली- ₹83.09

  • मुंबई- ₹86

  • अहमदाबाद- ₹82.25

  • गुरुग्राम- ₹91.70

  • नोएडा- ₹91.70

  • बेंगळुरू- ₹90

  • जयपूर- ₹90.91

  • चेन्नई- ₹91.50

  • पुणे- ₹92.50

  • कोलकाता – ₹93.50

  • लखनऊ- ₹95.75

  • हैदराबाद- ₹97

petrol diesel price
8th Pay Commission : बेसिक सॅलरी १८ हजारांवरून थेट ७२ हजार होणार? प्रस्ताव नेमका कुणाचा,जाणून घ्या संपूर्ण माहिती

कच्च्या तेलाच्या दरात किती वाढ झाली?

सोमवारी कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये चांगलीच वाढ झाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील ताज्या घडामोडींमुळे होर्मुज सामुद्रधुनीतून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता बाजारात व्यक्त केली जातेय. याच पार्श्वभूमीवर ब्रेंट क्रूड फ्युचर्सचे दर 3.5 टक्क्यांनी वाढून 78.67 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. तर अमेरिकेतील वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट (WTI) या कच्च्या तेलाच्या दरात 3.4 टक्क्यांची वाढ होऊन तो 73.87 डॉलर प्रति बॅरलवर गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com