Gold Rate Today: सोनं-चांदी महागली! सोनं ३००० तर चांदींच्या दरात ८००० रुपयांनी वाढ; वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर

Gold- Silver Rate Today: जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं-चांदीच्या दरामध्ये आज मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
Gold Rate Today: सोनं-चांदी महागली! सोनं ३००० तर चांदींच्या दरात ८००० रुपयांनी वाढ; वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर
Gold Rate TodaySaam Tv
Published On

संजय महाजन, जळगाव

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आज जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोनं ३००० रुपयांनी तर चांदी ८००० रुपयांनी महागली. सोनं-चांदीच्या दरामध्ये अचानक मोठी वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे.सोनं-चांदी महागल्यामुळे सराफा बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या सराफा बाजारात सोनं- चांदीच्‍या दरात सातत्‍याने चढउतार पाहण्यास मिळत आहे. जुलै महिन्‍याच्‍या पहिल्‍या दिवशी कमी झालेल्या सोनच्याच्या दरात पुन्‍हा वाढ झाली आहे. सोन्‍याच्‍या दरात ३००० रुपयांनी तर चांदीच्या दरामध्‍ये तब्‍बल ८००० रूपयांची वाढ झाली आहे.गत काही महिन्‍यांपासून सोनं- चांदीच्‍या दरात सातत्‍याने बदल होताना दिसत आहे.

Gold Rate Today: सोनं-चांदी महागली! सोनं ३००० तर चांदींच्या दरात ८००० रुपयांनी वाढ; वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर
Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळ्यामागे १२६०० रुपयांची घसरण; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर

जून महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवड्यात देखील सोनं– चांदीचे दर कमी झाले होते. सोन्‍याच्‍या दरात ५०० रूपयांची घसरण झाली होती. यानंतर जुलै महिन्‍याच्‍या पहिल्‍याच दिवशी म्‍हणजे १ जुलैला सोनं १५०० रुपयांनी तर चांदी २००० रूपयांनी स्‍वस्‍त झाली होती. पण आज जुलै महिन्याच्या दुसऱ्या दिवशी आज सोनं आणि चांदीच्‍या दरात मोठी वाढ झाली आहे.

Gold Rate Today: सोनं-चांदी महागली! सोनं ३००० तर चांदींच्या दरात ८००० रुपयांनी वाढ; वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर
Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळ्यामागे १२६०० रुपयांची घसरण; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर

बुधवारी सोनं विना जीएसटी १ लाख ४० हजार रुपये होते. आज सोन्याच्या दरामध्ये ३००० रुपयांची वाढ होऊन सोने एक लाख ४३ हजार रुपये झाले. तर बुधवारी १ किलो चांदी विनाजीएसटी २ लाख २५ हजार रुपये होती. त्यात आज तब्‍बल ८००० रुपयांची वाढ होऊन चांदी विना जीएसटी २ लाख ३३ हजार रुपयांपर्यंत गेली आहे. सोनं-चांदी महागल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

Gold Rate Today: सोनं-चांदी महागली! सोनं ३००० तर चांदींच्या दरात ८००० रुपयांनी वाढ; वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर
Gold Price Today: सोन-चांदी खरेदीची सुवर्णसंधी, सोनं २००० तर चांदी २५०० रुपयांनी स्वस्त; वाचा लेटेस्ट दर...

सोन्याचे आठवडाभरातील विना जीएसटी दर किती?

२७ जून - १ लाख ४३ हजार २००

२९ जून - १ लाख ४२ हजार

३० जून - १ लाख ४१ हजार ५००

१ जुलै - १ लाख ४० हजार

२ जुलै- १ लाख ४३ हजार

चांदीचे आठवडाभरातील विना जीएसटी दर किती?

२७ जून-२ लाख २७ हजार

२९ जून- २ लाख २७ हजार

३० जून-२ लाख २७ हजार

१ जुलै-२ लाख २५ हजार

२ जुलै- २ लाख ३३ हजार

Gold Rate Today: सोनं-चांदी महागली! सोनं ३००० तर चांदींच्या दरात ८००० रुपयांनी वाढ; वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर
Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, १० तोळं सोनं ३७,००० रुपयांनी महागलं; चांदीचे दर काय? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com