Salary Hike : बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी! पगारात मोठी वाढ; खात्यात येणार 15,500 रुपये जास्त

Maharashtra Bank Employee Salary Hike Update : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना १६ टक्के पगारवाढ मंजूर झालेली आहे. तसेच नवीन वेतन करारानुसार १५,५०० रुपयांपर्यंत वाढ आणि इतर सुविधाही मिळतील.
Maharashtra State Cooperative Bank Salary Hike 2026
Maharashtra State Cooperative Bank Salary Hike 2026saam tv
Published On: 

तुम्ही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बँकेतल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल १६ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नव्या वेतन करारामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात १५ हजार १५००० रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. पगारवाढीसोबतच कर्मचाऱ्यांना विविध सुविधाही मिळणार आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठीचा १२ वा वेतन करार १८ नोव्हेंबर रोजी करण्यात आला. बँकेच्या मुख्यालयात हा करार पार पडला. बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आणि को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सहा कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी या करारावर सहमती दिली आहे.

Maharashtra State Cooperative Bank Salary Hike 2026
PhonePe, Google Pay वापरणाऱ्यांनो लक्ष द्या! UPI चार्जबाबत महत्त्वाची बातमी

मागच्या वेतन करारापेक्षा जास्त पगारवाढ

मागच्या वेतन करारात कर्मचाऱ्यांच्या पगारात १२ टक्के पगारवाढ केली होती . पण यंदा त्यात वाढ करून थेट १६ टक्के पगारवाढ मंजूर केली. याआधीच बँकेने कर्मचाऱ्यांना १४.२५ टक्के बोनस दिला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे.

Maharashtra State Cooperative Bank Salary Hike 2026
Maharashtra Wage Rules : कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! सुट्टीच्या दिवशी काम केल्यास मिळणार डबल पगार

कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरक्षा कवच

या वेतन करारातली महत्त्वाची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी 'कुटुंब सुरक्षा कवच' योजना सुरू करण्यात आली. सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचं निधन झालं तर त्याच्या उर्वरित सेवाकाळातल्या प्रत्येक वर्षासाठी दोन महिन्यांचे वेतन कुटुंबाला दिलं जाणार आहे.

तसेच, मृत कर्मचाऱ्याच्या वारसाला बँकेच्या सेवेत सामावून घेण्यासाठी ३५ वर्षांपर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. याशिवाय, स्पर्धा परीक्षेत २० टक्के अतिरिक्त गुणांचे वेटेज दिलं जाणार आहे.

इतर कोणत्या सुविधा मिळणार?

नव्या करारानुसार महानगर क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५५०० रुपयांपर्यंत शहर भत्ता मिळणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या कर्ज मर्यादांमध्येही वाढ करण्यात आली आहे. एकूणच, १६ टक्के पगारवाढ, बोनस आणि विविध नवीन सुविधांमुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी हा वेतन करार महत्त्वाचा ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.