

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता सुट्टीच्या दिवशी काम केल्याने कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार मिळेल. महाराष्ट्र सरकारने कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी 'महाराष्ट्र वेतन नियम, 2026' लागू केलेत. ५ नोव्हेंबरपासून हे नवे नियम राज्यभर लागू झालं असून, यामुळे कामाचे तास, साप्ताहिक सुट्टी, पगारातली कपात आणि वेतनाची पावती याबाबत महत्त्वाचे बदल करण्यात आलेत.
नव्या नियमांनुसार, कर्मचाऱ्यांचा दैनंदिन कामाचा कालावधी ८ तासांचा निश्चित करण्यात आला आहे. तसेच आठवड्याला कामाचे तास ४८ पेक्षा जास्त असणार नाहीत. प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून किमान एक दिवस विश्रांती देणं बंधनकारक असेल.
एखाद्या कर्मचाऱ्याला सुट्टीच्या दिवशी काम करावं लागल्याने त्याला सामान्य वेतनाच्या किमान दुप्पट पैसे द्यावे लागतील. याशिवाय, त्याला दुसरी विश्रांतीची सुट्टी देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
नव्या नियमांनुसार, कर्मचाऱ्याच्या एका वेतन कालावधीतला एकूण पगारातून ५० टक्क्यांपेक्षा जास्त कपात करता येणार नाही. कोणताही दंड किंवा नुकसानीची रक्कम वसूल करण्याआधी कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस देऊन त्याची बाजू ऐकूण घेणं गरजेचं असेल.
आता प्रत्येक कर्मचाऱ्याला पगाराच्या दिवशी किंवा त्याआधी डिजिटल किंवा लेटर स्वरूपात सॅलरी स्लिप देणं नियोक्त्यासाठी बंधनकारक असेल. वेतन आणि उपस्थितीचे रेकॉर्ड किमान ५ वर्षे जतन करावे लागतील. वेतनाची गणना करण्यासाठीही प्रमाणित सूत्र निश्चित करण्यात आले आहे.
पगार न मिळणं, पगारातून विनाकारण कपात होणं किंवा महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये भेदभाव होत असेल तर कर्मचारी तक्रार करू शकतात. यासाठी कामगार संघटना किंवा संबंधित निरीक्षकांची मदतही घेता येईल. एकंदरीत, या नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन, योग्य विश्रांती आणि आर्थिक सुरक्षेचा जास्त आधार मिळण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.