CNG Hike : मोठी बातमी! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात सीएनजी महागला; आजचे ताजे दर किती? वाचा

Nandurbar CNG Price Hike Today : नंदुरबारमध्ये सीएनजीचा दर प्रतिकिलो १०५ रुपयांवर पोहोचला आहे. सहा महिन्यांत ८२ रुपयांवरून झालेल्या दरवाढीमुळे रिक्षा, टॅक्सीचालक आणि प्रवाशांवर आर्थिक भार वाढला आहे.
Nandurbar CNG News
Nandurbar CNG NewsAI Image
Published On: 
Summary
  • नंदुरबारमध्ये सीएनजीचा दर प्रतिकिलो १०५ रुपयांवर

  • काही महिन्यांपूर्वी ८२ रुपये असलेला दर आता २३ रुपयांनी वाढला

  • अलीकडे प्रतिकिलो पाच रुपयांची अतिरिक्त दरवाढ झाल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी

  • गुजरातच्या तुलनेत नंदुरबारमध्ये सीएनजी सुमारे दहा रुपयांनी महाग

सागर निकवडे, नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यात सीएनजीच्या दरात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाहनधारकांसह प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सीएनजीचा दर प्रतिकिलो १०५ रुपयांवर पोहोचल्याने वाहन चालवण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे रोजच्या प्रवासासाठी सीएनजीचा वापर करणाऱ्या नागरिकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

गेल्या सहा महिन्यांतील दरांचा विचार केला, तर सीएनजीच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. काही महिन्यांपूर्वी प्रतिकिलो ८२ रुपये होता. त्यानंतर पुन्हा दरवाढ लागू होताच सीएनजी १०० पार गेला. त्यातच अलीकडे आणखी पाच रुपयांची वाढ झाल्याने १०५ रुपयांवर सीएनजी पोहोचला आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे आधीच खर्चाचे नियोजन करणे कठीण झाले असताना या दरवाढीने त्यात आणखी भर घातली आहे.

Nandurbar CNG News
Sleep Health : अंतर्वस्त्रे न घालता रात्री झोपणं खरंच फायदेशीर आहे का?

नंदुरबार जिल्ह्यातील सीएनजीचे दर शेजारील गुजरातच्या तुलनेत जास्त असल्याची चर्चा आहे. गुजरातमध्ये सीएनजी सुमारे दहा रुपयांनी स्वस्त मिळत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांतील दरांमध्ये एवढी तफावत का आहे, असा प्रश्न वाहनधारक उपस्थित करत आहेत. या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम रिक्षाचालक, टॅक्सीचालक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांवर होण्याची शक्यता आहे.

Nandurbar CNG News
Potato Peels : बटाटा सोलून साली फेकून देता? 'असा' करा वापर, ८ दिवसांत दिसेल चमत्कार

सीएनजी महागल्यामुळे दररोज वाहन चालवण्यासाठी लागणारा खर्च वाढत आहे. मात्र, हा अतिरिक्त खर्च भरून काढण्यासाठी प्रवासी भाड्यात वाढ केल्यास प्रवाशांवरही आर्थिक भार पडू शकतो. दुसरीकडे, भाडेवाढ न केल्यास चालकांच्या रोजच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालकांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर सीएनजीच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com