Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Induction Use Tips: एलपीजी गॅसचा तुटवडा असल्याने अनेकांनी इंडक्शन मागवले आहे. इंडक्शन वापरण्याआधी तुम्हाला काही गोष्टी माहित असायलाच हव्यात. कोणती भांडी वापरावी, कोणती नाही याबाबत माहिती जाणून घ्या.
Induction Use
Induction UseSaam Tv
Published On
Summary

एलपीजी गॅसचा तुटवडा

नागरिकांना निवडला इंडक्शनचा पर्याय

इंडक्शन वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा

सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे व्यावसायिक गॅस बुकिंग बंद केली आहे. यामुळे हॉटेल व्यवसायिकांना फटका बसत आहे. घरगुती गॅस सिलिंडरसाठी नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. दरम्यान, अनेकांनी एलपीजी गॅस सिलिंडर मिळाला नाही तर काय होणार या भीतीने इंडक्शन घेतले आहे. इंडक्शनचा वापर जेवण बनवण्यासाठी केला जातो. तुम्हीही जर इंडक्शनचा वापर करणार असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहित असायलाच हव्यात.

Induction Use
LPG Gas Cylinder: कॉल करुन सिलेंडर बुक होत नाही? आत्ताच फॉलो करा या ४ स्टेप्स; बुकिंग करूनही न मिळाल्यास 'इथे' करा तक्रार

इंडक्शनवर कोणत्या प्रकारची भांडी वापरली जातात? (Which Vessels/Utensils use on Induction)

इंडक्शनवर अशा प्रकारची भांडी वापरली जातात ज्याच्या खालच्या बाजूला मॅग्नेटिक स्टिक्स असतील. यामध्ये कस्ट आयन, कार्बन स्टीलच्या भांड्याचा वापर करु शकतात.

कोणत्या प्रकारची भांडी इंडक्शनवर वापरु शकत नाही? (Which Utensils Usually do not Work on Induction)

इंडक्शनवर वापरण्यासाठी काही स्पेशल भांडी असतात त्याचाच वापर करायचा असतो. अॅल्युमिनयम, तांबे, काचेची भांडी, सिरॅमिक आणि नॉन मॅग्नेटिक स्टीलची भांडी तुम्ही वापरु शकत नाही.

इंडक्शनवर कढईचा वापर करु शकतो का? (Can We Use Regular Kadhai)

जी कढई खालच्या बाजूने सपाट असेल तीच कढई तु्ही वापरु शकतात. गोलाकार कढई तुम्ही वापरु शकत नाही. याचसोबत त्याला मॅग्नेटिक बेस असायला हवा. तुम्ही ट्रीपली स्टील कढई इंडक्शन बेस वापरु शकतात.

अॅल्युमिनियम वापरु शकतो का?

इंडक्शनवर तुम्ही नेहमी अॅल्युमिनियमची भांडी वापरु शकत नाही. अॅल्युमिनियमचा बेस हा बारीक असतो त्यामुळे याचा वापर करु शकता नाही. तवा, प्रेशर कुकरच्याबाबतीतही हाच नियम लागू होतो.

Induction Use
LPG भारतात कसा आला? पहिले एलपीजी कनेक्शन कधी बसवण्यात आले?

तुम्ही कोणतेही पदार्थ तळू शकता का? (Can You Deep Fry on Induction)

हो, तुम्ही इंडक्शनवर कोणतेही पदार्थ तळू शकतात. फक्त यासाठी तुम्ही योग्य भांड्याचा वापर करायचा आहे. कढईचा आकार थोडा मोठा असाला आणि त्याचा बेस सपाट असायला हवा.

इंडक्शनवर रोटी आणि वांग्याचं भरीत बनवू शकतो का? (Can We Make Roti and Baingan Bharta on Induction)

तु्म्ही इंडक्शनवर चपाती बनवू शकता. परंतु त्यासाठी योग्य भांडं वापरणे गरजेचे आहे. परंतु तुमच्या चपात्या नेहमीसारख्या फुगणार नाही. तुम्ही वांग्याचे भरीतदेखील तव्यावर रोस्ट करु शकता.परंतु त्यामुळे वाग्यांला स्मोकी फ्लेवर येणार नाही. त्यामुळे तुम्ही विचार करुन हे पदार्थ बनवा.

Induction Use
Famous Actor : 'बिग बॉस' फेम अभिनेता विकतोय LPG सिलिंडर? किंमत वाचून येईल चक्कर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com