LPG Price Hike: दिवाळीपूर्वी महागाईचा स्फोट, LPG सिलिंडरच्या दरात १० रुपयांची वाढ; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Commercial LPG cylinder price hike: नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाई वाढली. व्यावासायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर आहेत.
LPG Price Hike: दिवाळीपूर्वी महागाईचा स्फोट, LPG सिलिंडरच्या दरात १० रुपयांची वाढ; तुमच्या शहरातील आजचे दर किती?
Commercial LPG Cylinder Price Hike From Novermber 1AI image
Published On: 
  • दिवाळीपूर्वी सर्वांना महागाईचा झटका बसला

  • १ नोव्हेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

  • मुंबई, दिल्ली आणि पुण्यासह देशभरातील अनेक शहरातील सिलिंडरचे दर बदलले

दिवाळीपूर्वी महागाईचा स्फोट झाला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि उपहारगृह मालकांना महागाईचा मोठा झटका बसला. नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दिल्ली, मुंबई आणि कोलकातासह देशभरातील अनेक शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर चेन्नईमध्ये गॅस सिलिंडरच्या दरात ११.५० रुपयांची वाढ झाली. महत्वाचे म्हणजे, सध्या घरगुती स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झाला नाही.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे नवे दर १ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. देशभरातील शहरांनुसार गॅस सिलिंडरच्या दरात थोडासा फरक आहे. व्यावयासिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे व्यावसायिकांना फटका बसणार आणि दिवाळीमध्ये फराळाच्या किमती वाढणार आहेत. १९ किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत वाढल्यानंतर आता हा सिलिंडर खरेदीसाठी दिल्लीत २,८२० रुपये, मुंबईत २,७७४.५० रुपये आणि कोलकातामध्ये २,९६४ रुपये मोजावे लागणार आहेत.

चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर ११.५० रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत आता २,९९४.५० रुपये झाली आहे. बंगळुरूमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १० ची वाढ झाली असून आजपासून हा सिलिंडर २,९०८ रुपयांना खरेदी करावा लागणार आहे.

तर घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर असल्यामुळे सर्वासामान्यांना दिलासा मिळाला. चेन्नईमध्ये घरगुती सिलिंडरची किंमत ९५७.५ रुपये आहे. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९४१.५ रुपये आहे. अहमदाबादमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९४९ रुपये इतकी आहे. शिलाँगमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १००७.५० रुपये आहे. बिहारमध्ये घरगुती गॅश सिलिंडरची किंमत १०४० रुपये आहे. उत्तर प्रदेशमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९७९.५० रुपये इतकी आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, खानावळ आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये केला जातो. दरवाढीमुळे या व्यवसायांचा खर्च वाढू शकतो. परिणामी गॅस सिलिंडरचे दर वाढल्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमती वाढू शकतात आणि हॉटेलमधील जेवण देखील महाग होऊ शकतो. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.