

Sona Chandi Bhav : जुलै महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाली. मागच्या तीन आठवड्यापासून सोन्यात दरवाढ झाली. परंतु, पुन्हा सोन्या-चांदीचे भाव घसरण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतील महागाई कमी करण्यासाठी व्याजदर वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने-चांदी स्वस्त होऊ शकते. डॉलरला अधिक महत्त्वपूर्ण करण्यासाठी फेडरल रिझर्व्ह बँक या तयारीत आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात उतरी कळा दिसून येणार आहे. (Today Gold Silver Rate)
1. आजचा सोन्याचा भाव
गुड रिटन्सच्या वेबसाईट्नुसार काल 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold) 54,400 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,320 रुपये मोजावे लागले आहे. फ्युचर्स बाजारात आज सोने-चांदी स्वस्त झाले असले तरी सराफ बाजारात ते किंचित वाढले आहे. तर 7 जुलैला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी 54,300 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,220 रुपये (Money) मोजावे लागणार आहे.
2. चांदीचे दर
गुड रिटन्सच्या वेबसाईट्सनुसार 6 जुलै 10 ग्रॅमसाठी 730 रुपये मोजावे लागले तर आज 7 जुलैला १ किलो चांदीसाठी 7230 रुपये मोजावे लागणार आहे.
3. तुमच्या शहरातील दर
आज २४ कॅरेटसाठी मुंबईत (Mumbai) ५९,०७० रुपये, दिल्लीत ५९,२२० तर पुण्यात ५९,०७० रुपये मोजावे लागणार आहे.
4. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?
सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.