ITR Filing Of Deceased Person: मृत व्यक्तीचे सुद्धा भरता येणार Income Tax Return, जाणून घ्या कशी असेल प्रोसेस

Income Tax Return Filing Process Online : अनेकांना याबाबत देखील माहीत नसेल की, इन्कम टॅक्स रिटर्न हा मृत व्यक्तीसाठी देखील असतो.
ITR Filing Dead Person
ITR Filing Dead PersonSaam tv
Published On

Tax Filing Process: इन्कम टॅक्स भरताना हल्ली प्रत्येकाचा गोंधळ उडतो. कोणत्या व्यक्तीला इन्कम टॅक्स भरावयाचा आहे हे समजत नाही. तसेच तो रिटर्न मिळताना कोणत्या व्यक्तीला मिळेल याबाबत देखील कोणाला माहीत नसते.

परंतु, अनेकांना याबाबत देखील माहीत नसेल की, इन्कम टॅक्स रिटर्न हा मृत व्यक्तीसाठी देखील असतो. आयकर विभागाने सांगितले आहे की, व्यक्तींच्या मृत्यूनंतरही कोणत्या प्रकारचे उत्पन्न मिळत असतील तर त्या व्यक्तीच्या नावावरही आयकर रिटर्न भरण्याची सुविधा आहे. त्याचे इन्कम टॅक्स रिटर्न हे त्याच्या कायदेशीर वारसाद्वारे दाखल केले जाते. यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. घरबसल्या कसे भरता येईल जाणून घ्या

ITR Filing Dead Person
Rupali Bhosale : नको करू सखी असा साजिरा शृंगार...!

1. ऑनलाइन प्रोसस कशी कराल ?

  • ITR File भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम www.incometaxindiaefiling.gov.in/home वेबसाइटवर जावे लागेल.

  • यानंतर पासवर्ड आणि पॅन कार्डच्या (Pan card) मदतीने लॉगिन करा आणि माय अकाउंटवर जा.

  • अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला Nominee म्हणून नोंदणी करावी लागेल.

  • यानंतर, New Request वर क्लिक करा. तसेच त्यावर मृत व्यक्तीचे नाव, पॅन कार्ड व बँक (Bank) डिटेल्स भराव्या लागतील.

  • माहीती मंजूर झाल्यानंतर तुम्ही ITR भरू शकता.

ITR Filing Dead Person
Pan Card Inactive : पॅन कार्ड आधारशी लिंक नाही? मग, या 12 महत्त्वपूर्ण कामांना लागणार ब्रेक

2. मृत व्यक्तीचा ITR कसा भरायचा ?

  • वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला आयटीआर फॉर्म डाउनलोड करावा लागेल.

  • फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला XML फाईल तयार करावी लागेल व त्या फॉरमॅटमध्ये फॉर्म अपलोड करावा लागेल.

  • पॅन कार्डच्या पर्यायामध्ये तुम्हाला वारसा असल्याचे पुफ्र द्यावी लागेल. तसेच त्यात मूल्यांकन वर्षाचा पर्याय निवडावा लागेल.

  • फॉर्म अपलोड केल्यानंतर तुमची डिजिटल स्वाक्षरी करून फॉर्म सबमिट करावा लागेल. तसेच रिटर्न भरण्यापूर्वी मिळणारे उत्पन्न किती आहे हे देखील पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com