Gold Silver Price (28th July) : आनंदाची बातमी! सोन्याचा भाव घसरला, चांदीही नरमली; जाणून घ्या आजचे दर

Today's 28th July Gold Silver Rate In Maharashtra : जाणून घेऊया आज १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील
Gold Silver Price (28th July)
Gold Silver Price (28th July)Saam Tv
Published On: 

Gold Silver Rate In Maharashtra :

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्त्याने चढ-उतार होत असतो. मागच्या दोन महिन्यात धातूंनीच्या किमती घसरल्या होत्या. मात्र जुलै महिन्यात सोन्या-चांदीचे भाव वाढले.

अमेरिकेतील घडामोडींवर सोने-चांदीची आगेकूच होत असते. काल सोन्याने ६० हजारांचा आकडा पार केला होता त्यामुळे खरेदीदारांचा कल कमी दिसून आला. जाणून घेऊया आज १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील.

Gold Silver Price (28th July)
How to Test Gold Purity At Home : तुमचं सोने खरे आहे की खोटे ? या सोप्या टिप्सवरुन कळेल

1. आजचा सोन्याचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाईट्नुसार काल २७ जुलैला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold) 55,600 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,400 रुपये मोजावे लागले होते. तर आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)55,250 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,260 रुपये मोजावे लागणार आहे. मागच्या भावानुसार आज २२ कॅरेटच्या भावात 350 रुपयांनी वाढ झाली तर २४ कॅरेटच्या भावात 140  रुपयांनी (Money) कमी झाले आहेत.

2. चांदीचा भाव

ग्राहकांचा कल हा सोने-चांदी खरेदी करण्याकडे अधिक असतो. अशातच गुड रिटन्सच्या वेबसाईट्सनुसार २८ जुलैला चांदीच्या (silver) १० ग्रॅम भावासाठी 764 रुपये तर 1 किलो चांदीसाठी 76,400 रुपये मोजावे लागणार आहे.

Gold Silver Price (28th July)
Maharashtra Famous Dam: महाराष्ट्रातील 6 अशी धरणं ज्यांना पावसाळ्यात भेट देऊन मनमोहक निसर्गसौंदर्याचा आनंद मिळेल

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - 60,550 रुपये

  • दिल्ली - 60,260 रुपये

  • हैदराबाद - 60,110 रुपये

  • कोलकाता - 60,110 रुपये

  • लखनऊ - 60,260रुपये

  • मुंबई - 60,110 रुपये

  • नागपूर - 60,110रुपये

  • पुणे - 60,110 रुपये

Gold Silver Price (28th July)
Thane Picnic Spots: पिकनिक स्पॉट शोधताय? ते ही ठाण्यात; ही १० पर्यटनस्थळे आहेत उत्तम पर्याय...

4.  हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.