
6 Dams Of Maharashtra That You Must Visit In Monsoon: महाराष्ट्र राज्य हे विविधांगाने नटलेल. पावसाळ्यात या काळात निसर्ग हिरवीगार शाल पांघरतो. या ऋतूमध्ये अनेक पर्यटक प्रेमी फिरण्यासाठी किंवा निसर्ग पाहण्यासाठी घराबाहेर पडतात.
पावसाळ्यात सगळीचं धरणं ओसंडून वाहत असतात. पांढर शुभ्र पाणी व हिरवीगार वनराई पाहण्याचं दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते. जर तुम्हालाही महाराष्ट्रातील धरणांना भेट द्यायची असेल किंवा त्यांच मनमोहक दृश्य अनुभवायचे असेल तर या धरणांना नक्की भेट द्या.
1. भंडारदरा विल्सन धरण
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात वसलेले भंडारदरा विल्सन धरण. पावसाळ्यात भंडारदरा धरण व रंधा धबधबा पर्यटकांना (Travel) खुणावतो. निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.
2. गंगापूर धरण
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण गोदावरी नदीवर स्थित असून याचे सौंदर्य पावसाळ्यात (Monsoon) अधिक खुलते. या धरणाच्या पाण्यावर नाशिक जिल्हा समृध्द व विकसित आहे.
3. भावली धरण
मुंबई-आग्रा महामार्गापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर स्थित असे भावली धरण. डोंगरांच्या मधोमध जलाशय असल्याने त्याचे सौंदर्य काही वेगळेच दिसते. जलाशयातील निळेशार पाणी आणि दुसऱ्या बाजूस असणारा धबधबा क्षणात मोहून टाकतो. हे धरण नाशिकमधील इगतपूरीजवळ वसलेले आहे.
4. जायकवाडी धरण
जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामधील प्रमुख धरण असून मराठवाड्यात वसलेले आहे. आशिया खंडातील मोठं मातीचं धरण अशी याची ख्याती आहे.
5. राधानगरी धरण
राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे. भोगावती नदीवर बांधण्यात आले असून त्याचा उपयोग शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी व वीज निर्मितीसाठी होतो. पावसाळ्यात येथील मनमोहक दृश्य पर्यटकांच्या मनाचा ठाव घेतात.
6. कोयना धरण
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोयना धरण हे कोयना नदीवर वसले आहे. हे धरण महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वात मोठे धरण आहे. कोयना धरणाचा जलाशय हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. हा जलाशय त्याच्या निसर्गसंपन्न परिसराकरिता परिचित आहे. जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे. तिथे कोयना, सोळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे. त्या परिसरात बोटिंग व इतर पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.