कोमल दामुद्रे
सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असताना देखील आपण सोनं खरेदी करतो.
लग्नसराईच्या काळात अनेकांचा कल हा सोनं खरेदीवर असतो.
अशावेळी खरे सोने कसे ओळखायचे, ते खरेदी करताना काय काळजी घ्यायची याची माहिती नसते.
सध्या अनेक सराफ बाजारात सोनं शुद्ध आहे की, नाही हे तपासण्यासाठी पारदर्शकता आणली आहे. तरीही शुद्ध सोने कसे ओळखावे याविषयी आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.
सोने खरेदी करताना त्यावर बीआयएस हॉलमार्कचा शिक्का पहावा.
२४ कॅरेट म्हणजेच शुद्ध सोन्याचे दागिने बनवता येत नाहीत. कारण शुद्ध सोने खूपच मऊ असते
दागिन्यांसाठी २२ कॅरेट किंवा त्यापेक्षा कमी शुद्ध सोन्याचा वापर केला जातो.
शुद्ध सोने दाताखाली दाबले तर मऊ असल्याने त्यावर दाताचे निशाण पडते.
सोन्यात इतर धातू मिसळलेले असतील, तर त्यावर दाताची खूण पडत नाही.
सोन्याचा दागिना बादलीभर पाण्यात टाकून पहा. जर पाण्याच्या धारेबरोबर तो काही वेळ तरंगला तर त्यात भेसळीची शक्यता असते
सोने कितीही कमी प्रमाणात म्हणजे लहान आकाराचे असले तरी ते पाण्यात बुडतेच.