Gold Silver Price (12th August): गोल्डन चान्स! सलग पाचव्या दिवशी घसरला सोन्या-चांदीचा भाव, जाणून घ्या आजचा दर

Today's 12th August Gold Silver Rate In Maharashtra : ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील पाचव्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण कायम आहे.
Gold Silver Price (12th August)
Gold Silver Price (12th August)Saam tv
Published On

Gold Silver Rate In Maharashtra (12th August):

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळतो. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील पाचव्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण कायम आहे.

जुलै महिन्यात सोने-चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. परंतु, मे-जून मध्ये दरात घसरण झालेली पाहायला मिळाली. तसेच ऑगस्ट महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरुच आहे. मागच्या आठवड्यापासून दरात ४००० रुपयांनी घसरण झाली आहे. १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील हे जाणून घेऊया.

Gold Silver Price (12th August)
Gold Silver Price (11th August): मोके पे चौका! सोन्या-चांदीच्या भावात नरमाई, जाणून घ्या आजचा दर

1. आजचा सोन्याचा भाव

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, आज १२ ऑगस्टला १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५८,८८० आहे तर काल याची किंमत ५९,२१० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती.

2. चांदीचा भाव

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७०,१०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७०,०९० रुपये प्रतिकिलो होती.

Gold Silver Price (12th August)
Independence Day 2023 Place: 15 ऑगस्टच्या वीकेंडला फिरण्याचा प्लान करताय? ही 10 ऐतिहासिक स्थळे ठरतील नंदनवन

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार,  मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याची किंमत ५३,९७३ प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट  सोन्याचा (Gold) दर ५३,९७३ रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ५३,९७३रुपये इतका असेल.

Gold Silver Price (12th August)
Don't Eat Wheat For A Month : महिनाभर गव्हाचे पदार्थ खाऊच नका, शरीरात होतील हे बदल

4.  हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com