Gold Silver Price (11th August): मोके पे चौका! सोन्या-चांदीच्या भावात नरमाई, जाणून घ्या आजचा दर
Gold Silver Rate In Maharashtra (11th August):
काल सेन्सेक्सचा भाव कोसळल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळतो. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही सोन्याच्या भावात घसरण कायम आहे.
डॉलरच्या किमती महागल्या असून अमेरिकन केंद्रीय केंद्रिय बँकेतही रेपो रेट घसरल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात बदल पाहायला मिळाले. त्यामुळे खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी आहे. जाणून घेऊया आज १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील.
1. आजचा सोन्याचा भाव
गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार १० ऑगस्टला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)54,850 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,820 रुपये मोजावे लागले होते. तर आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)54700 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,660 रुपये मोजावे लागणार आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या भावात १६० रुपयांनी घसरण झाली आहे.
2. चांदीचा भाव
गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार आज चांदीसाठी ७३,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. त्यामुळे खरेदीदारांची गर्दी आज पाहायला मिळेल.
3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार , मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याची किंमत 59,510 प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा (Gold) दर 59,510 रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 59,510 रुपये इतका असेल.
4. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?
सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

