कोमल दामुद्रे
भारतातील बहुतेक घरांमध्ये गव्हाची चपाती खाल्ली जाते. हा आपल्या आरोग्याचा भाग आहे.
गव्हाच्या चपातीमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळतात, जे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
याशिवाय ते आपली पचनक्रिया व्यवस्थित ठेवते. मात्र, जर तुम्ही फक्त गव्हाची चपाती खात असाल तर तुमचे आरोग्य बिघडू शकते.
जर आपण महिनाभर गव्हाची चपाती खाणे बंद केले तर शरीरात काय बदल होतात ते जाणून घेऊया.
गव्हाची चपाती जास्त खाल्ल्याने वजन वाढते, कारण गव्हामध्ये ग्लूटेनचे प्रमाण वाढल्याने शरीरात चरबी जमा होते.
जर तुम्ही महिनाभर गव्हाची चपाती खाणे बंद केले तर तुमचे वजन बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.
कार्बोहायड्रेट्समुळे गव्हाची चपाती खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
महिनाभर गव्हाची चपाती खाणे बंद केले तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
चपातीमध्ये असलेले कार्बोहायड्रेट देखील थकवा वाढवण्याचे काम करते. जर तुम्ही महिनाभर गव्हाची चपाती खाणे बंद केले तर तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल.
शरीरात अतिरिक्त कार्बोहायड्रेट जमा झाल्यामुळे त्याचे फॅटमध्ये रुपांतर होते, ज्यामुळे हृदयविकाराची समस्या उद्भवू लागते.