कोमल दामुद्रे
भारतात जगातील सर्वात मोठी तरुण लोकसंख्या आहे परंतु, यामध्ये तणावग्रस्त तरुणांचा समावेश अधिक प्रमाणात आहे.
यातील मुख्य कारण म्हणजे काम आणि करिअरमधल्या संघर्षामुळे तणावाची समस्या वाढत आहे.
UN च्या या नुकत्याच झालेल्या अहवालात 15-24 वयोगटातील सुमारे 254 दशलक्ष लोकसंख्या असलेली भारताची सर्वात मोठी तरुण लोकसंख्या आहे.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोनुसार 2021 मध्ये आत्महत्या करून मरण पावलेल्या लोकांची संख्या 1.64 लाख आहे.
यामध्ये 18-30 वयोगट आणि 30-45 वयोगटातील आत्महत्या अनुक्रमे 34.5% आणि 31.7% आहेत.
बुधवारी प्रसिद्ध झालेल्या माइंड-पीअर्स मेंटल स्ट्रेंथ रिसर्चनुसार, सर्वेक्षण केलेल्या 7500 पेक्षा अधिक लोकांपैकी 33% तणावाच्या समस्यांनी ग्रस्त आहेत.
याचे मुख्य कारण आहे पैसा, करिअरची चिंता, कमी होत चालेला संवाद यामुळे तणावाचे कारण वाढते आहे.
सध्या मानसिक आरोग्य हे राष्ट्रीय संकंट बनले आहे. पैशांच्या अभावामुळे तरुणांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता होताना पाहायला मिळत आहे.
सतत येणारे अपयश, चिंता, तणाव व करिअरमध्ये येणारे नैराश्य यामुळे तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. तसेच यावर मात करण्यासाठी समुपदेशकांची कमतरता देखील आहे.