कोमल दामुद्रे
लाल किल्ला हा दिल्लीतील एक प्रसिद्ध मुघलकालीन किल्ला आहे. याचे नाव लाल संगमरवरी दगडावरून पडलेले आहे. हा किल्ला यमुना नदीच्या किनारी बांधला गेला.
इंडिया गेट वॉर मेमोरिअल येथे विविध युद्धांमध्ये प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय जवानांना आदरांजली वाहण्यात आली.
मुंबई, महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक स्थळ. गेटवे ऑफ इंडिया येथे ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रम या दिवशी पाहायला मिळते.
अंदमान आणि निकोबार बेटांमधील कुप्रसिद्ध सेल्युलर जेलला भेट देऊ शकता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगवास भोगावा लागला.
या मार्मिक ऐतिहासिक स्थळावर ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी होऊन जालियनवाला बाग हत्याकांडात प्राण गमावलेल्या शहीदांचे स्मरण करता येईल
वाघा बॉर्डरवरील रोमांचक वातावरणाचा अनुभव घेता येईल, जिथे बीटिंग रिट्रीट सोहळा होतो. ही भारत आणि पाकिस्तानची सीमा आहे.
अमृतसरमधील इंडिया गेट हे स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या उत्साहाने साजरे करण्यासाठी आणखी एक उत्तम ठिकाण आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सवांचे साक्षीदार होण्यासाठी कोलकाता, पश्चिम बंगालमधील व्हिक्टोरिया मेमोरियलला भेट देऊ शकता.
हैदराबाद, तेलंगणा येथे स्थित गोलकोंडा किल्ला ऐतिहासिक महत्त्व आणि भव्यतेसाठी ओळखला जातो. स्वातंत्र्यदिनी विशेष कार्यक्रम असतात.
कर्नाटकातील बंगळुरू येथील लालबाग बोटॅनिकल गार्डनमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या फुलांच्या शोचा आणि इतर उत्सवांचा आनंद घेता येईल.