

Ladki Bahin Yojana May June 3000 Installment Update : जून महिन्याचा आठवडा गेला, पण अद्याप मे महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे मे आणि जून या दोन महिन्यांचे हप्ते कधी येणार? अशी चर्चा राज्यातील महिलांमध्ये सुरू आहे. ईकेवायसीनंतर ८० लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्या आहेत. पण पात्र महिलांच्या नजरा मे आणि जून या हप्त्याकडे लागल्या आहेत. राज्यातील पात्र महिलांच्या खात्यावर एकत्र ३००० जमा होणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात घोंघावत आहे.
दरम्यान, राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे आचारसंहिता सुरू असताना खात्यात पैसे येणार की नाही? असा प्रश्न विचारला जात आहेत. अशातच आता लाडक्या बहिणींना मे आणि जून या दोन महिन्यांचे हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
लाडकीला मे-जूनचे पैसे एकत्र येणार (Ladki Bahin Yojana May June Installment May Come Together)
जून महिना सुरू होऊन आता आठवडा झाला आहे, पण अद्याप हप्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता या महिन्यात दोन महिन्याचे म्हणजे मे आणि जूनचे हप्ते एकत्र येणार का? असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला हप्ता दिला जातो. पण आचारसंहिता असल्यामुळे हप्ता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
३००० खात्यात कधी येणार? मे-जून हप्त्याबाबत मोठी अपडेट will women get ₹3000 together May June installment update
१८ जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याळे त्याआधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर हप्ता जमा होण्याची शक्यता कमीच आहे. निवडणुकीनंतरच महिलांच्या खात्यात हप्ता जमा होऊ शकतो. जर या निवडणूकांनंतर पैसे येणार असतील तर मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतो. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या अखेरीस दोन महिन्यांचे एकत्र पैसे खात्यावर येऊ शकतात.
किती महिलांना मिळणार लाभ? Ladki Bahin Yojana Update today
ईकेवायसीनंतर राज्यातील अनेक महिलांचा लाभ बंद झाला आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज सरकारकडून बाद करण्यात आले आहेत. ८० लाखांच्या आसपास महिलांचा लाभ बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एक कोटी ६६ लाख महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रूपयांचा लाभ मिळणार आहे. मे आणि जून हप्त्याबाबत सरकारकडून लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.