Ladki Bahin Yojana: ६६ लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, सरकारचा १० हजार कोटींचा भार कमी, महत्वाची अपडेट वाचा

Ladki Bahin Yojana Latest Update: लाडकी बहीण योजनेतल्या ६६ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. पात्र महिलांना मार्च- एप्रिलचे ३ हजार रुपये लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana Latest Update
Ladki Bahin Yojana Updategoogle
Published On

मुख्यमंत्र्यांनी सुरु केलेली लाडकी बहीण योजना सर्वच महिलांसाठी खूप महत्वाची ठरली. यामध्ये पात्र महिलांना आत्तापर्यंतचे सगळ्याच हप्त्यांचा लाभ घेता आला आहे. महत्वाचं म्हणजे यामध्ये लाखो अपात्र महिलांनी अर्ज केले होते. मात्र पडताळणीनंतर ६६ लाख लाडक्या बहिणी अपात्र म्हणून घोषित केल्या गेल्या. यामुळे सरकारला सर्वात जास्त फायदा झाला आहे.

एकूण अपात्र बहिणींची संख्या

राज्यात आता १ कोटी ७७ लाख बहिणी या पात्र ठरल्या असून ६६ लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. यासाठी सरकारला महिन्याला आता २ हजार ६५५ कोटी होईल. याआधी हा खर्च ३ हजार ६०० कोटी रुपये इतका होता. यामुळे सरकारला आता दिलासा मिळाला आहे. म्हणजेच सरकारचे आता एकूण दहा हजार कोटी रुपये वाचणार आहेत.

Ladki Bahin Yojana Latest Update
Jio Recharge Plan: Jioचा फक्त १२५ चा प्लान, कॉलिंग अन् डेटासह मिळणार खूपकाही फायदे

लाडक्या बहिणीचा पुढचा हप्ता कधी येणार?

लाडक्या बहिणीच्या योजनेत गरीब आणि गरजू महिलांना १५०० रुपयांचा हप्ता दिला जातो. हा हप्ता थेट महिलांच्या खात्यात जमा केला जातो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून मार्च-एप्रिलचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. तसेच मिळालेल्या माहितीनुसार एकूण ३ हजार रुपये एकाचवेळी महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. त्यासाठी सरकारकडून तयारी करण्यात आली आहे. तर हा हप्ता याच आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे.

महत्वाची माहिती

जर लाडक्या बहिणींना हप्ते येत नसतील तर तुमची ई-केवायसी झालेली नसू शकते. दुसरं कारण म्हणजे जर तुमचे वार्षिक उत्पन्न जास्त असेल किंवा घरात चार चाकी वाहनं असतील तर तुम्हाला हप्ते मिळणार नाहीत. अन्यथा सरकारच्या आय टी विभागाने अनेक लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात येईल.

Ladki Bahin Yojana Latest Update
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा, फक्त व्याजातून मिळणार 4.50 लाख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com