

सध्या लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच सोशल मीडिया किंवा ओटीचा वापर करतात. त्यामध्ये तुम्हाला रोज वेब सिरीज, चित्रपट, लाइव्ह स्पोर्ट्स, Disney, HBO यांसारख्या गोष्टी पाहता येतात. हे प्लॅटफॉर्मपाहण्यासाठी तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असणे गरजेचे आहे. जिओने आता त्यांच्या युजर्ससाठी एक धमाकेदार आणि स्वस्तात मस्त ऑफर आणली आहे. त्यामध्ये तुम्हाला महिनाभर JioHostar पाहता येणार आहे. पुढे आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
JioHotstar ने आपल्या सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये मोठा बदल केला आहे. त्यामध्ये महिन्याचे रिचार्ज प्लॅन्स जाहीर केले आहेत. मोबाईलवर सिरीज पाहणारे युजर्स असोत किंवा घरात मोठ्या टीव्हीवर कुटुंबासोबत चित्रपट आणि लाईव्ह स्पोर्ट्स पाहणारे प्रेक्षक, प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. हीच बाब लक्षात घेऊन JioHotstar ने आता स्वस्त परवडणारा महिन्याचा रिचार्ज प्लान सादर केले आहेत. या नव्या प्लॅनची सुरुवात फक्त 79 रुपयांपासून असेल ते 28 जानेवारी 2026 पासून नव्या युजर्ससाठी लागू होईल आहेत.
JioHotstar कडून Mobile, Super आणि Premium अशा तीन टियरमध्ये मासिक प्लॅन सुरू करण्यात आले आहेत. यामुळे युजर्सना आपली पाहण्याची सवय, वापरलेले डिव्हाइस आणि बजेट यानुसार प्लॅन निवडता येतील. गेल्या काही दिवसात Connected TV वर कंटेंट पाहण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे मोबाईल युजर्ससाठी वेगळे आणि कुटुंबासाठी मोठ्या स्क्रीनवर पाहण्यास योग्य असे प्लॅन देण्यात आले आहेत.
हॉलीवूड कंटेंटबाबतही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. Super आणि Premium प्लॅनमध्ये आता हॉलीवूड चित्रपट आणि सिरीजचा समावेश असेल. मात्र, Mobile प्लॅन वापरणाऱ्या युजर्ससाठी हॉलीवूड कंटेंट पाहण्यासाठी पर्सनल Add-on पर्याय उपलब्ध असेल. त्यामुळे ज्यांना जो पाहिजे त्या प्रकारचा कंटेंट पाहायता येईल.
आधीच JioHotstar चे सबस्क्रिप्शन घेतलेल्या युजर्ससाठी ही बातमी दिलासादायक आहे. सध्याच्या युजर्सच्या प्लॅनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. Auto-renewal सुरू असल्यास, त्याच किमतीत आणि त्याच सुविधांसोबत सबस्क्रिप्शन पुढे सुरू राहणार आहे. त्यामुळे जुन्या युजर्सवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.