Malanggad Funicular Train: मलंगगड फ्युनिक्युलर सेवा सुरू, 2 तासांचा प्रवास अवघ्या ७ मिनिटांत होणार; भाडे किती असणार?

Ambarnath News: अंबरनाथमधील श्री मलंगगडावर फ्युनिक्युलर सेवा सुरू झाली असून केवळ 50 रुपयांत दर्शन शक्य झाले आहे. वृद्ध व आजारी भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Ambarnath Malanggad
Malanggad funiculargoogle
Published on
Ambarnath Malanggad
Ambarnath Malanggadgoogle

भाविकांसाठी आनंदाची बातमी

अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावरील फ्युनिक्युलर सेवा अखेर सुरू झाली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही सुविधा भाविकांच्या सेवेत दाखल झाली आहे.

Ambarnath Malanggad photos
Ambarnath Malanggad photosgoogle

लोकप्रतिनिधींच्या हस्ते उद्घाटन

रविवारी भाजप आमदार किसन कथोरे आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते फ्युनिक्युलर सेवेचे उद्घाटन करण्यात आले.

Malanggad ropeway photos
Malanggad ropeway photos

वृद्ध व आजारी भाविकांना मोठा दिलासा

या सेवेमुळे वृद्ध, आजारी तसेच चालण्यात अडचण असलेल्या भाविकांना मलंगगडावर दर्शनासाठी मोठी सोय होणार आहे.

Malanggad ropeway photos
Malanggad ropeway photosgoogle

प्रवासाचा वेळ आणि क्षमता

फ्युनिक्युलरद्वारे मलंगगडावरील प्रवासाचा कालावधी फक्त 4 ते 5 मिनिटांचा आहे. एका वेळी 90 प्रवासी या रोपवेमधून प्रवास करू शकतात.

Malanggad ropeway photos
Malanggad ropeway photosgoogle

तिकीट दर आणि सवलत

मलंगगड फ्युनिक्युलरचे जाण्या-येण्याचे तिकीट दर 50 रुपये आहे. 75 वर्षांवरील नागरिक आणि 21 वर्षांखालील प्रवाशांना 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. 2004 मध्ये प्रस्तावित आणि 2012 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प विविध अडथळ्यांमुळे रखडला होता. मात्र, यात्रेआधीच सेवा सुरू झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com