Sakshi Sunil Jadhav
Jio चा महिनाभराचा प्लान अनेक वापरत असतात. कारण हा प्लान सगळ्यांना सोयीचा आणि महिन्याला बरा पडतो.
jioचे भारतात मोठ्या प्रमाणात युजर्स आहेत. कारण याच्या रिचार्ज प्लानमध्ये सातत्याने बदल होत असतात.
पुढे जिओने त्यांच्या युजर्ससाठी एक खुशखबर दिली आहे. ज्याने ग्राहकांना नव्या वर्षात बचत करता येणार आहे.
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म सगळ्यांनाच पाहायचे असतात. त्यामुळे त्यांना वेगळं सबस्क्रीपशन घ्यावं लागतं. मात्र पुढील रिचार्जमध्ये तुम्हाला मोफत या सुविधा मिळणार आहेत.
नुकताच जिओने ५०० रुपयांचा एक प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे. यामध्ये तुम्हाला YouTube Premium सोबत कॉलिंगचे आणि इतर Ottचे अनेक फायदे मिळणार आहेत.
५०० रुपयांचा रिचार्ज हा २८ दिवसांचा असेल. त्यात एकूण ५६ जीबी डेटा मिळेल. तर दिवसाला २ जीबी डेटा मिळेल.
तुम्हाला यामध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दिवसाला १०० SMS मिळणार आहेत. यासाठी वेगळे शुल्क देण्याची गरज नाही.
तुम्हाला यामध्ये ओटीटीचे सब्सक्रिप्शन मिळेल. त्यामध्ये प्रीमियम व्हिडीओ मोबाइल एडीशन, जिओहॉटस्टार, सोनी एलआयव्ही, झी 5, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी+, सन NXT, Kanchha Lannka, प्लॅनेट मराठी, Chaupal, Hoichoi, FanCode, JioTV आणि JioAICloud मोफत मिळेल.
जर तुम्ही नवे युजर्स असाल तर तुम्हाला जिओ होमची २ महिन्यांची मोफत चाचणी आणि जिओ AI क्लाउडवर ५० जीबी स्टोरेज मिळेल. या रिचार्ज प्लान मधली खास बाब म्हणजे १८ महिन्यांचा मोफत गुगल जेमिनी प्रो प्लॅन सुद्धा मिळेल.