ITR Refund Update : ITR चा रिफंड खात्यात जमा झाला नाही? ‘या’ ५ गोष्टी वेळीच तपासा

ITR Refund Update News : ITR Refund मिळाला नाही? बँक खाते, e-Verification, जुन्या टॅक्सची थकबाकी, TDS आणि ITR Processing Status या 5 गोष्टी कशा तपासायच्या ते जाणून घ्या.
Income Tax Refund News
Income Tax Refund News AI Image
Published On
Summary
  • ITR Refund मिळाला नसेल तर सर्वप्रथम ITR Processing आणि Refund Status तपासा

  • ITR चे e-Verification पूर्ण झाले आहे का, हे नक्की पाहा

  • जुन्या टॅक्सची थकबाकी किंवा आयकर विभागाची कोणतीही सूचना प्रलंबित आहे का, हे तपासा

तुम्हीसुद्धा इनकम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR भरला? आता तुम्हीसुद्धा त्याचा रिफंड कधी येतोय याची वाट पाहात असाल ना? मात्र अनेकदा ITR दाखल करून त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही रिफंडची रक्कम बँक खात्यात जमा होत नाही. अशावेळी घाबरण्याची गरज नाही. रिफंड जमा व्हायला उशीर होण्यामागे काही कारणे असतात. जसे की, बँक खात्याची माहिती, ITR चे e-Verification, जुन्या टॅक्सची थकबाकी किंवा TDS मधील तफावत यांसारखी कारणे असू शकतात.

जर तुमचा ITR Refund अद्याप मिळाला नसेल, तर आयकर विभागाच्या e-Filing पोर्टलवर जाऊन या 5 गोष्टी नक्की तपासा.

बँक खात्याची माहिती योग्य आहे का?

ITR भरल्यानंतर लगेच रिफंड खात्यात न मिळण्यामागे बँकेशी संबंधित काही प्रॉब्लेम्स असू शकतात. तुमचे बँक खाते आयकर पोर्टलवर Pre-Validated आहे का, हे तपासा. तसेच PAN कार्डवरील नाव आणि बँक खात्यातील नाव जुळते का, हेही पाहा. खाते बंद असणे, चुकीचा IFSC कोड किंवा अपूर्ण बँक माहिती असल्यास रिफंड अडकू शकतो.

ITR चे e-Verification झाले आहे का?

केवळ ITR दाखल करणे पुरेसे नाही. त्याचे e-Verification पूर्ण करणेही आवश्यक आहे. आधार OTP, नेट बँकिंग किंवा उपलब्ध इतर माध्यमातून ITR चे व्हेरिफिकेशन करता येते. व्हेरिफिकेशन पूर्ण न झाल्यास रिटर्नच्या प्रक्रियेला उशीर होऊ शकतो.

Income Tax Refund News
Cucumber Benefits : काकडी सोलायची की नाही? ९०% लोक करतात ही चूक; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

जुन्या टॅक्सची थकबाकी

जर तुम्ही मागचा राहिलेला टॅक्स भरला नसेल तर, रिफंड मिळण्यासाठी उशीर होतो. अशा परिस्थितीत आयकर विभागाकडून मेसेज येऊ शकतो. हा मेसेज तुम्हाला पोर्टलवर येऊन पाहावा लागेल.

Form 26AS, AIS आणि TDS तपासा

ITR मध्ये भरलेली माहिती TDS हा Form 16, Form 26AS आणि AIS मधील माहितीसोबत जुळणे गरजेचे आहे. या नोंदींमध्ये फरक असल्यास रिटर्नच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

ITR Processing आणि Refund Status पाहा

e-Filing पोर्टलवरील View Filed Returns मध्ये जाऊन ITR चा स्टेटस तपासा. रिफंड फेल झाल्याचे दिसत असल्यास बँक खात्याची माहिती दुरुस्त करून उपलब्ध पर्यायाद्वारे रिफंड पुन्हा करण्याची विनंती करता येऊ शकते.

Income Tax Refund News
Diabetes Diet : फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

रिफंडला उशीर झाल्यास काय कराल?

सर्वप्रथम ITR चा स्टेटस तपासा आणि बँक खाते, e-Verification, जुन्या टॅक्सची थकबाकी आणि TDS यामध्ये काही चुका आहे का हे पाहा. आयकर विभागाकडून कोणतीही नोटीस किंवा अतिरिक्त कारवाईची सूचना आली असल्यास ती दुर्लक्षित करू नका. काही परिस्थितींमध्ये Section 244A अंतर्गत रिफंडवर व्याज मिळू शकते. मात्र त्याची पात्रता आणि कालावधी संबंधित प्रकरणातील तथ्ये व लागू नियमांवर अवलंबून असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com