

आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आयकर विवपणपत्र (ITR ) भरलेल्या करदात्यांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. ३० जून ही करदात्यांसाठी महत्वाची तारीख ठरू शकते. कारण ज्यांनी वेळेत ITR भरला आहे, त्यांनाही आयकर विभागाकडून छाननीसाठी म्हणजेच Scrutiny नोटीस पाठवली जाऊ शकते. त्यामुळे ITR भरल्यानंतरसुद्धा करदात्यांनी अलर्ट राहणं महत्वाचं आहे.
आयकर विभाग कलम १४३ (२) अंतर्गत काही आयकर विवरणपत्रांची निवड तपासणीसाठी करतो. पण नोटीस मिळाली म्हणजे करदात्याने काही चूक केली आहे किंवा कर चुकवला आहे, असं समजण्याचं कारण नाही. अनेकदा विभाग फक्त ITR मधली माहितीची पडताळणी करण्यासाठी नोटीस जारी करतो.
आयकर विभाग तुमचे घोषित उत्पन, वजावटी, करसवलती आणि गुंतवणुकीची माहिती फॉर्म 26AS, AIS, TIS, बँकेचे व्यवहार आणि इतर आर्थिक नोंदीशी जुळतेय का, याची तपासणी करतो. उत्पन्न आणि नोंदींमध्ये काही चूक असेल. मोठे आर्थिक व्यवहार उत्पन्नाशी जुळत नसल्यास किंवा विविध दस्तऐवजांमधल्या माहितीमध्ये चूक आढळल्यास Scrutiny नोटीस येऊ शकते.
जर आयकर विभागाची नोटीस मिळाली तर घाबरण्याची गरज नाही. सर्वात आधी ती नोटीस काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करून Worklist या पर्यायावर जा. पुढे तुम्हाला e-Proceedings हा पर्याय निवडावा लागेल. नोटीसमध्ये मागितलेली माहिती आणि कागदपत्रे ऑनलाइन सादर करता येतात. विभागाच्या निरीक्षणाशी सहमती असेल तर आवश्यक पुरावे अपलोड करा.
असहमत असेल तर योग्य कारणांसोबत आपली बाजू तुम्ही मांडू शकता. करदात्यांनी या नोटीसकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळेत उत्तर दिलं नाही तर जास्त कराची मागणी, दंड, व्याज परतावा रखडण्याची शक्यता असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.