ITR Filing 2026 : पगार १२.७५ लाखांपर्यंत असला तरीही भरावे लागेल टॅक्स, काय त्यामागचं नेमकं कारण?

Income Tax Return India : ₹12.75 लाखांपर्यंत पगार असला तरी STCG, LTCG, ऑनलाइन गेमिंग, लॉटरी किंवा इतर विशेष उत्पन्नावर आयकर लागू होऊ शकतो. ITR भरताना सर्व उत्पन्नाची अचूक माहिती देणे गरजेचं आहे.
Income Tax Return India
ITR Filing 2026google
Published On

नवीन कर प्रणाली लागू झाल्यानंतर बऱ्याच कर्मचाऱ्यांना असं वाटतं की, त्यांचं वार्षिक उत्पन्न १२.७५ लाखांपर्यंत असेल तर त्यांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही. पण प्रत्येकाच्या बाबतीत हे खरं नसतं. काही विशिष्ट प्रकारच्या उप्तन्नावर वेगळ्या दराने टॅक्स घेत जात असल्याने अशा व्यक्तींना टॅक्स भरावा लागू शकतो.

सरकारकडून मिळणारी कलम 87A अंतर्गत टॅक्ससवलत ही फक्त सामान्य ट‌ॅक्सस्लॅबमध्ये येणाऱ्या उत्पन्नावर लागू होते. पण काही उत्पन्नावर स्वतंत्र कर नियम लागू असल्यामुळे त्या उत्पन्नावर ही सवलत मिळत नाही. यामध्ये शेअर्स विकून मिळणारा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG), लॉन्ग टर्म कॅपिटल गेन (LTCG), लॉटरीमधून मिळालेली रक्कम, घोड्यांच्या शर्यतीतून मिळालेलं उत्पन्न तसेच ऑनलाइन गेमिंग किंवा फॅन्टसी स्पोर्ट्समधून मिळालेलं बक्षीस यांचा समावेश होतो.

Income Tax Return India
Bhajyachi Amti Recipe : वरण - भात कशाला? आजच बनवा ही झणझणीत भज्यांची आमटी

समजा, एखाद्या व्यक्तीचा वार्षिक पगार १२.७५ लाखांपेक्षा कमी असला, तरी त्याने ऑनलाइन गेमिंगमधून पैसे जिंकले असतील तर त्या उत्पन्नावर स्वतंत्र टॅक्स भरावा लागू शकतो. ऑनलाइन गेमिंगमधल्या कमाईवर ३० टक्के दराने टॅक्स आकारतात.बरेच गेमिंग प्लॅटफॉर्म अशा कमाईवर टीडीएस (TDS) सुद्धा कापतात.

म्हणूनच आयकर रिटर्न (ITR) भरताना अशा उत्पन्नाची माहिती लपवू नका. शेअर्समधून मिळालेला नफा शॉर्ट टर्म किंवा लॉन्ग टर्म कॅपिटल गेन म्हणून योग्य प्रकारे दाखवा. शेअर्सची खरेदी आणि विक्रीची संपूर्ण माहिती द्या. तसेच AIS आणि Form 26AS मधल्या माहितीशी आपल्या ITR मधली माहिती जुळतेय का? याची खात्री करा.

लॉटरी, घोड्यांच्या शर्यती किंवा ऑनलाइन गेमिंगमधून मिळालेला पैसे सुद्धा ITR मध्ये नमूद करणं गरजेचं असतं. फक्त पगार १२.७५ लाखांपेक्षा कमी आहे म्हणून संपूर्ण उत्पन्न टॅक्सफ्री आहे, असा समज करून घेऊ नका. जर अशा प्रकारचं उत्पन्न लपवलं किंवा चुकीची माहिती दिली, तर आयकर विभागाकडून पुढे टॅक्सची मागणी नोटीस येऊ शकते. त्यामुळे ITR भरताना सर्व उत्पन्नाची अचूक माहिती देणे हा सर्वात सुरक्षित आणि योग्य पर्याय आहे.

Income Tax Return India
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी! बंद झालेला ₹1500 चा हप्ता पुन्हा सुरू होणार, आदिती तटकरेंनी दिली अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com