Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी! बंद झालेला ₹1500 चा हप्ता पुन्हा सुरू होणार, आदिती तटकरेंनी दिली अपडेट

Maharashtra Women Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ई-केवायसी पूर्ण करुनही हप्ता बंद झालेल्या लाडकी बहीण योजनेतल्या पात्र महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी सुरू झाली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanameata ai
Published On

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या (Ladki Bahin Yojana) हजारो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करूनही बऱ्याच महिलांचा महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता बंद झाला होता. आता अशा सर्व पात्र महिलांच्या अर्जांचे पुन्हा एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातल्या महिलांना आधार देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे. अशा पात्र महिलांच्या बँक खात्यात महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. पण ई-केवायसीतल्या त्रुटी किंवा कागदपत्रांच्या पडताळणीतल्या अडचणींमुळे अनेक महिलांचे हप्ते थांबले होते.

Ladki Bahin Yojana
EPFO New Rule : मोठा निर्णय! नोकरी बदलताच PF रक्कम होणार आपोआप ट्रान्सफर, अर्जाची गरज नाही

आदिती तटकरे यांनी सांगितलं की, ई-केवायसीसाठी सरकारने अनेकदा मुदतवाढ दिली होती. सुरुवातीला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आणि नंतर ती ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतरही ज्या महिलांच्या ई-केवायसीमध्ये काही चुका राहिल्या होत्या, त्यांना त्या दुरुस्त करण्यासाठी एप्रिल २०२६ पर्यंत संधी देण्यात आली.

सरकारच्या माहितीनुसार, ई-केवायसी न केल्यामुळे ६० लाखांपेक्षा जास्त महिला योजनेबाहेर राहिल्या आहेत. तसेच उप्तन्न मर्यादा ओलांडल्यामुळे १३ ते १४ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे.

मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केलं की, ज्या महिलांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण केली असुनही लाभ मिळालेला नाही, त्यांच्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जात आहे. कोणत्याही पात्र महिलेला अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी त्यांनी ग्वाही दिली. तसेच संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांसाठी अर्ज करुनही कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नसल्यामुळे त्या महिलांना किमान एका योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Ladki Bahin Yojana
Bhajyachi Amti Recipe : वरण - भात कशाला? आजच बनवा ही झणझणीत भज्यांची आमटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com