Indian Railway: रेल्वे पास UTS वरून Railone अ‍ॅपवर कसा ट्रान्सफर करायचा?, फॉलो करा सोपी स्टेप

RailOne App: रेल्वे प्रवाशांना तिकिटापासून ते रेल्वे ट्रॅकिंगपर्यंत सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळावी यासाठी भारतीय रेल्वेने Railone अ‍ॅप सुरू केले. रेल्वे पास UTS वरून Railone अ‍ॅपवर कसा ट्रान्सफर करायचा? ते जाणून घ्या एका क्लिकवर...
Indian Railway: रेल्वे पास UTS वरून Railone अ‍ॅपवर कसा ट्रान्सफर करायचा?, फॉलो करा सोपी स्टेप
RailOne AppSaam tv
Published On

Summary -

  • भारतीय रेल्वेने RailOne सुपर अ‍ॅप सुरू केले

  • UTS अ‍ॅपवरील मासिक पास सेवा बंद करण्यात आली

  • ‘Transfer Ticket’ लिंकद्वारे पास ट्रान्सफर करणं शक्य

  • RailOne मध्ये तिकीट बुकिंगसह अनेक सुविधा एकत्र मिळतात

भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेत UTS मोबाइल अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी RailOne हे नवीन मोबाईल अ‍ॅप सुरू केले. UTS अ‍ॅप अद्याप पूर्णपणे बंद झाले नसले तरी देखील मासिक पास बुकिंग आणि रिनिवल यासारखे फिचर्स कायमचे बंद करण्यात आले आहे. RailOne एकाच प्लॅटफॉर्मवर अनेक रेल्वे सेवा एकत्रित करत असल्याने प्रवाशांना यापुढे वेगवेगळे अ‍ॅप्स मोबाइलमध्ये डाउनलोड करण्याची गरज नाही.

तिकीट काढताना प्रवाशांना अ‍ॅपचा वापर सोप्या पद्धतीने करता यावा यासाठी भारतीय रेल्वेने Railone अ‍ॅप हे प्रवाशांसाठी सुपर अ‍ॅप म्हणून डिझाइन केले आहे. हे अ‍ॅप पूर्वी वेगवेगळ्या अ‍ॅप्समध्ये पसरलेल्या अनेक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते. UTS अ‍ॅपच्या वपिरीत जे फक्त अनारक्षित तिकीटे आणि मासिक पासना समर्थन देते. Railone अ‍ॅपप युजर्सला आरक्षित आणि अनारक्षित दोन्ही तिकीटे बुक करण्याची परनानगी देते. ते एकाच लॉगिनचा वापर करून उपनगरिय लोकल ट्रेनचा मासिक पास काढून शकतात.

Indian Railway: रेल्वे पास UTS वरून Railone अ‍ॅपवर कसा ट्रान्सफर करायचा?, फॉलो करा सोपी स्टेप
Railway App Launch : एका क्लिकवर सर्व सुविधा; रेल्वेच्या नव्या ॲपबद्दल जाणून घ्या

रेल्वे प्रणालीशी प्रवाशांचा संवाद कसा वाढतो हे सुधारण्यासाठी RailOne अ‍ॅपची रचना करण्यात आली आहे. त्याचा इंटरफेस स्वच्छ आणि वापरण्यास सोपा आहे आणि तो अँड्रॉइड प्ले स्टोअर आणि iOS अ‍ॅप स्टोअर दोन्हीवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप आर-वॉलेटद्वारे अनारक्षित यूटीएस तिकिट बुकिंगला सपोर्ट देखील करते. युजर्सना या तिकिटांवर ३ टक्के सूट मिळू शकते. Railone अ‍ॅपवर लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंगची देखील सुविधा उपलब्ध आहे. प्रवासी अ‍ॅपवरील तक्रार निवारण वैशिष्ट्याद्वारे तक्रारी दाखल करू शकतात. प्रवाशांना वाढीव सुविधा प्रदान करणाऱ्या या अ‍ॅपवर ई-केटरिंग, पोर्टर बुकिंग आणि लास्ट-माईल टॅक्सी सेवा देखील मिळतात.

Indian Railway: रेल्वे पास UTS वरून Railone अ‍ॅपवर कसा ट्रान्सफर करायचा?, फॉलो करा सोपी स्टेप
RailOne: रेल्वेचा मोठा निर्णय! RailOne अ‍ॅप लाँच; काय सुविधा मिळणार?

आरक्षित तिकिटे अजूनही आयआरसीटीसीद्वारे बुक केली जातात. इतर भागीदार अ‍ॅप्सप्रमाणेच Railone आयआरसीटीसीद्वारे अधिकृत आहे. हे अ‍ॅप एमपिन किंवा बायोमेट्रिक लॉगिन वापरून सिंगल साइन-ऑनला समर्थन देते. रेलकनेक्ट आणि यूटीएस क्रेडेन्शियल्स देखील कार्य करतात. RailOne mPIN किंवा बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे लॉगिनसह सिंगल-साइन-ऑन सिस्टम देते. युजर्स त्यांच्या विद्यमान RailConnect आणि UTS क्रेडेन्शियल्स वापरून देखील लॉग इन करू शकतात.

Indian Railway: रेल्वे पास UTS वरून Railone अ‍ॅपवर कसा ट्रान्सफर करायचा?, फॉलो करा सोपी स्टेप
Indian Railway: रेल्वेचं RailOne अ‍ॅप लाँच! तिकीट बुकिंगपासून ते ट्रेन ट्रॅकिंग सर्वकाही एका क्लिकवर

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'ट्रान्सफर तिकीट' लिंक वापरून सीझन पास Railone मध्ये ट्रान्सफर करावे लागेल. ज्यामुळे वॉलेट बॅलन्स आपोआप हस्तांतरित होईल. हे करण्यासाठी प्रवाशांना काही सोप्या स्टेप फॉलो कराव्या लागतील...

- अपडेट केलेले UTS अ‍ॅप उघडा आणि 'ट्रान्सफर तिकीट' लिंक शोधा.

- ट्रान्सफर करण्यासाठी तुमचा सक्रिय सीझन पास पर्याय निवडा.

- पास RailOne शी लिंक करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.

- तुमच्या ओळखपत्रांचा वापर करून RailOne वर लॉगिन किंवा नोंदणी पूर्ण करा.

- तुमच्या RailOne अकाऊंटमध्ये कोणताही UTS वॉलेट बॅलन्स स्वयंचलितपणे ट्रान्सफर करा.

- RailOne वर नोंदणी केल्यानंतर युजर्सना अतिरिक्त सुरक्षिततेसाठी M-PIN सेट करणे आणि वापरणे आवश्यक आहे.

Indian Railway: रेल्वे पास UTS वरून Railone अ‍ॅपवर कसा ट्रान्सफर करायचा?, फॉलो करा सोपी स्टेप
RailOne App: रेल्वेचा मोठा निर्णय! यापुढे UTS अ‍ॅपवरुन मासिक पास काढता येणार नाही; पर्याय काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com