Railway App Launch : एका क्लिकवर सर्व सुविधा; रेल्वेच्या नव्या ॲपबद्दल जाणून घ्या

RailOne App Launch : भारतीय रेल्वेने RailOne नावाचे नवीन सुपरऍप लाँच केले आहे. यात राखीव आणि अनारक्षित तिकीट बुकिंग, PNR स्थिती, ट्रेन ट्रॅकिंग, जेवण ऑर्डरिंग, R‑Wallet, Rail Madad तक्रारी आणि मालवाहतुक चौकशी अशा एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध आहेत.
Railway app launch
Railway Service DisruptionSaam tv
Published On

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. वातावरणाच्या किंवा तांत्रिक कारणास्तव ट्रेन कधी कधी उशिराने धावतात. तसेच रेल्वे प्रवाशांच्या अनेक तक्रारी येतात. यावर तोडगा म्हणून रेल्वेने नवीन ॲप लाँच केले आहे. या ॲपचे नाव 'रेलवन' ठेवण्यात आले आहे. 'रेलवन' च्या एका क्लिकवर संपूर्ण रेल्वे सेवा कशापद्धतीने आहे हे पाहायला मिळेल.

रेल्वेने प्रवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी नवा ॲप लाँच केला आहे. या ॲपचे नाव 'रेलवन' ठेवण्यात आले आहे. हा ॲप अँड्रॉइड प्ले स्टोअर आणि आयओएस ॲप स्टोअर अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. ज्याद्वारे लाखो प्रवाशांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा दिसतील. हा ॲप प्रवाशांच्या सोयी आणि अनुभव नोंदवण्याच्या उद्देशाने तयार केला आहे. या ॲपच्या माध्यमातून राखीव तिकिटे, अनारक्षित तिकिटे प्रवाशांना पाहता येतील. तसेच प्रवासी ज्या गाडीने प्रवास करत असतील त्या गाडीचे लोकेशन देखील पाहता येणार आहे.

Railway app launch
Railway New Rules: तात्काळ तिकीट ते ...; १ जुलैपासून रेल्वेचे नियम बदलणार, जाणून घ्या

रेल्वेकडून काही मदत हवी असल्यास त्यावर प्रवासी तक्रार नोंदवू शकतात. आणि मदतही मिळवू शकतात. त्याचप्रमाणे रेल्वेमध्ये बसल्या जागेवरून जेवण देखील ऑर्डर करू शकतात. या व्यतिरिक्त मालवाहतुक सेवांबद्दल देखील या ॲपद्वारे प्रवासी चौकशी करू शकतात.

Railway app launch
Railway Rules:सीट मिळणार की नाही? रेल्वे आरक्षण चार्ट आता 24 तास अगोदरच मिळणार, भारतीय रेल्वे विभागाचा मोठा निर्णय

भारतीय रेल्वेच्या या डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासात रेलवन ॲप हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रवाशांना सुविधा, विश्वास आणि चांगला अनुभव प्रदान करण्याच्या दृष्टीने हे ॲप एक महत्त्वाचे पाऊल आहे. आता प्रवाशांना वेगळ्या ॲप्सची आवश्यकता नाही कारण रेलवनद्वारे एकाच ठिकाणी बोटांच्या क्लिकवर संपूर्ण माहिती प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com