Railway Rules:सीट मिळणार की नाही? रेल्वे आरक्षण चार्ट आता 24 तास अगोदरच मिळणार, भारतीय रेल्वे विभागाचा मोठा निर्णय

New Indian Railways Rule: आतापर्यंत ट्रेन सुरू होण्याच्या चार तास आधी ट्रेन आरक्षण चार्ट तयार केला जातो. ट्रेनचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही हे चार तास आधी कळते.
New Indian Railways Rule
New Indian Railways Rulesaam tv
Published On

आपल्यातील बहुतेकजण रेल्वेने प्रवास करताना रेल्वेचं तिकीट रिझर्व्हेशन करत असतो. परंतु रिझर्व्हेशनची यादी रेल्वे प्रवास सुरू होण्याच्या ४ तास आधी सीट नंबरची यादी लागत असते. त्यामुळे आपलं सीट निश्चित झालं की नाही याची शाश्वती नसते. त्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला असतो. पण आता तसं होणार नाही कारण आता ट्रेन आरक्षण यादी २४ तास आधीच जाहीर केले जाणार आहे.

जर तुम्ही ट्रेनचे वेटिंग तिकीट बुक केले असले तर शेवटच्या क्षणापर्यंत ते कन्फर्म होईल की नाही याबद्दल शंका असते. पण आता तसे होणार नाही. भारतीय रेल्वे एका नवीन नियमाची चाचणी घेत आहे, ज्यामध्ये रेल्वे सुटण्याच्या २४ तास आधी आरक्षण चार्ट तयार केला जाणार आहे. जर हा बदल लागू झाला तर प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही हे एक दिवस आधीच कळणार आहे.

सध्याची व्यवस्था काय आहे?

सध्या रेल्वे गाडी सुटण्याच्या सुमारे चार तास आधी आरक्षण चार्ट तयार केले जाते. त्यामुळे वेटिंग तिकीट असलेले प्रवासी शेवटच्या क्षणापर्यंत ट्रेनमध्ये प्रवास करू शकतील की नाही याबद्दल चिंतेत असतात. नवीन प्रणालीमध्ये आता चार्ट २४ तास आधीच तयार केला जाईल. यामुळे प्रवाशांकडे जास्त वेळ मिळेल. जर एखाद्या प्रवाशाचे तिकीट कन्फर्म झाले नाही, तर ते वेळेत आपला ट्रेन प्रवास रद्द करू शकतात आणि आपले पैसे परत मागू शकतात.

रेल्वेच्या सध्याच्या नियमांनुसार, जर एखाद्या प्रवाशाने ट्रेन सुटण्याच्या ४८ ते १२ तास आधी तिकीट रद्द केले तर भाड्याच्या २५% रक्कम वजा केली जाते. सुटण्याच्या १२ ते ४ तास आधी तिकीट रद्द करण्याचा शुल्क आणखी जास्त आहे. आरक्षण चार्ट तयार झाल्यानंतर तिकीट रद्द केल्यास कोणताही परतावा दिला जात नाही. नवीन नियम लागू झाल्यानंतर, ही रद्द करण्याची विंडो पूर्वीच्या वेळेवर जाईल.

New Indian Railways Rule
Maharashtra ST Tourism Scheme: राज्यभरात खुशाल फिरा! प्रवास भाडे, जेवण आणि निवासाचं टेन्शन विसरा, काय आहे ST Tourism Scheme

त्यामुळे प्रवाशांना वेळेत निर्णय घेण्याची संधी मिळेल. दरम्यान तिकीट रद्द केल्यावर परतफेड रक्कम देखील कोच क्लासवर अवलंबून असते. एसी क्लासची तिकिटे महाग असल्याने, रद्दीकरण शुल्क देखील जास्त असते. स्लीपर आणि जनरल क्लासमध्ये हे शुल्क एसीपेक्षा कमी असते. जर वेटिंग तिकीट रद्द केले तर जवळजवळ संपूर्ण भाडे परत केले जाते.

रिफंड स्टेटस कुठे तपासाल?

जर तुम्ही आयआरसीटीसी वेबसाइट किंवा मोबाईल अॅपद्वारे तिकीट बुक केले असेल, तर तुम्ही तेथून परतफेड स्थिती तपासू शकता. रद्दीकरण शुल्क आणि परतफेड रक्कम प्लॅटफॉर्मवर स्पष्टपणे दाखवली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com