Maharashtra ST Tourism Scheme: राज्यभरात खुशाल फिरा! प्रवास भाडे, जेवण आणि निवासाचं टेन्शन विसरा, काय आहे ST Tourism Scheme

Maharashtra ST Tourism Scheme: नागरिकांना स्वस्तात प्रवास करता यावा, यासाठी महाराष्ट्र् राज्य परिवहन मंडळातर्फे विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत.
Maharashtra ST Tourism Scheme
Maharashtra ST Tourism Schemesaam tv
Published On

तुम्हाला फिरायला आवडतं? पण खाणं आणि राहण्याच्या खर्चाचा विचार करताय? तर त्याचं टेन्शन विसरा आणि लगचे बॅग पॅकिंगला लागा. अहो, तुम्हाला फिरायला आवडतं तर तुमच्यासाठी महाराष्ट्र् परिवहन मंडळानं एक छान योजना आणलीय. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही राज्यातील विविध धार्मिक स्थळांना भेट देऊ शकतात.

दरम्यान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ही योजना केवळ प्रवासपुरती मर्यादित नाहीये. धार्मिक पर्यटन, विद्यार्थ्यांसाठी सुविधा, प्रादेशिक प्रशासकीय सुधारणा आणि नागरिकांच्या सोयींचा समावेश करणारी आहे. या योजनेचा लाभ र्वसामान्य नागरिकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत, सर्वजण घेऊ शकतात.

Maharashtra ST Tourism Scheme
eKYC Ration Card: मोबाईलवर घरबसल्या करा रेशन कार्डची eKYC; पहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस, कधी आहे अखेरची मुदत

ST महामंडळाने खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या सहकार्याने धार्मिक पर्यटनाची योजना सुरू केलीय. याअंतर्गत सामान्य नागरिकांना महाराष्ट्रातील विविध प्रसिद्ध धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. यासाठी नियोजित सहलींचे आयोजन केलं जाणार आहे.

या सहलींमध्ये प्रवास, निवास, भोजनचा समावेश असणार आहे. या सर्व सोयी अत्यंत कमी दरात उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे निवांतपणे तुम्ही सहलीचा आनंद घ्या. फिरणं आणि राहण्याच्या खर्चाचा विचार करू नका. वयोवृद्ध असो, की महिला किंवा तरुण-तरुणी यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी धार्मिक पर्यटन अगदी परवडणाऱ्या भाड्यात करता येणार आहे.

विशेष म्हणजे या सहली गर्दीच्या काळात काढल्या जाणार नाहीत. यामुळे प्रवाशांना व्यवस्थित आणि आरामात देव दर्शनाचा अनुभव घेता येईल. विद्यार्थ्यांना ST पास मिळवण्यासाठी स्थानकावर जावे लागत होते. आता हे पास विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत किंवा महाविद्यालयात मिळणार आहेत. त्यामुळे यामुळे रांगेत उभे राहण्याचा त्रास, वेळ वाचणार आहे.

Maharashtra ST Tourism Scheme
EPFO: आनंदाची बातमी! पीएफ खात्यातून ५ लाखांची अ‍ॅडव्हान्स रक्कम काढता येणार

एसटी महामंडळाच्या सहल योजनांमध्ये खालील गोष्टींचा समावेश

धार्मिक स्थळांसाठी विशेष सहली:

एसटी महामंडळ, खासगी टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मदतीने धार्मिक स्थळांसाठी कमी गर्दीच्या दिवसांमध्ये सहली.

कमी दरात प्रवास

ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर विशिष्ट गटांसाठी सवलतीच्या दरात प्रवास उपलब्ध करून दिला जाईल.

विशेषय योजना

एसटी महामंडळ, विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी विशेष गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com