Indian Railway: रेल्वेचं RailOne अ‍ॅप लाँच! तिकीट बुकिंगपासून ते ट्रेन ट्रॅकिंग सर्वकाही एका क्लिकवर

Indian Railway RailOne App: रेल्वेने प्रवाशांसाठी खास RailOne अॅप लाँच केले आहे. या अॅपमध्ये तुम्ही अनेक कामे करु शकतात. तुम्हाला प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या अॅपवर जाण्याची गरज नाही.
Indian Railway
Indian RailwaySaam Tv
Published On
Summary

रेल्वेचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय

आता RailOne अॅप लाँच

तिकीट बुकिंगपासून ते पेमेंट करण्यापर्यंत सर्व कामे होणार एका क्लिकवर

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना आता तिकीट बुकिंगमध्ये कोणतीही अडचण येणार आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी खास RailOne अॅप लाँच केले आहे. या एकाच अॅपवरुन तुम्ही अनेक कामे करु शकतात. तुम्हाला या अॅपवर तिकीट बुकिंग, ट्रेनची माहिती, तक्रार, फिडबॅक आणि प्लॅटफॉर्म तिकीट काढता येणार आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच अॅपवर काही मिनिटांत करता येणार आहे.

Indian Railway
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! महिन्याला ५००० रुपये गुंतवा अन् ८.५ लाख मिळवा

रेल्वे मंत्रालयानुसार, RailOne अॅप रेल्वे तिकीट बुकिंगसाठी (IRCTC), आरक्षण नसलेले (UTS), प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग, ट्रेनची माहिती, कोचची माहिती या सगळ्यासाठी वापरु शकणार आहात. तुम्हाला काही क्लिकवर ही कामे करता येणार आहे. ही सर्व कामे करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे अॅप डाउनलोड करावे लागत होते. आता ही सुविधा तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे.

RailOne अॅपची खासियत (RailOne App Features)

आता तुम्हाला IRCTC Rail Connect, UTS, Rail Madad, eCatering आणि National Train Enquiry System असे वेगवेगळे अॅप वापरण्याची गरज नाही. या सर्व अॅपची कामे आता एकच RailOne अॅप करणार आहे.

रेल्वे वॉलेट

या RailOne अॅपमध्ये तुम्हाला डिजिटल वॉलेटची सुविधा मिळणार आहे. यामुळे तुम्हाला तिकीट बुकिंग करताना काही मिनिटांत पेमेंट करता येणार आहे. यासाठी mPIN किंवा बायोमॅट्रिक लॉग इनचा वापर करता येणार आहे.

Indian Railway
Maharashtra New Railway Line: मोदी सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट! दोन रेल्वे मार्गांना मंजुरी; कोणाला होणार फायदा?

रजिस्ट्रेशन सुविधा अधिक सोपी

जर तुम्ही या अॅपवर नवीन असाल तर रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. तुम्हाला फक्त मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर ओटीपी येईल. याच्या साहाय्याने तुम्ही अॅपमध्ये अकाउंट उघडू शकतात.हे अॅप Android आणि iOS दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे.

Indian Railway
Railway Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com