Railway Expansion: राज्यातील ४८ रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार! पुणे, नाशिक, कोल्हापूर, बीडकरांना होणार फायदा; रेल्वे मंत्र्यांची घोषणा

Railway Expansion Pune 6 Platform Expand: रेल्वे एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वे एकूण ४८ स्थानकांचा विस्तार करणार आहे. यात पुण्याती ६ फलाटांचा विस्ता केला जाणार आहे.
Railway Expansion
Railway ExpansionSaam tv
Published On
Summary

४८ रेल्वे स्थानकांचा विस्तार करणार

पुण्यातील ६ फलाटांचा विस्तार करणार

अश्विनी वैष्णव यांची घोषणा

रेल्वे मंत्रायलाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आबे. ४८ प्रमुख रेल्वे स्थानकांचा विस्तार केला जाणार आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे. यामध्ये पुणे विभागातील एकूण ६ फलाटांचा समावेश आहे. या स्थानकांवरील रेल्वेची संख्या दुपटीने वाढवणार आहे.

Railway Expansion
Central Railway: बदलापूर ते कर्जतदरम्यान दोन नव्या रेल्वे मार्गिका; रेल्वे मंत्रालयाने दिला ग्रीन सिग्नल; काम कधीपर्यंत पूर्ण होणार?

रेल्वेच्या या सहा फलाटांमध्ये बीड, लातूर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर मार्गांसोबतच दक्षिण आणि उत्तर भारतात रेल्वेचे जाळे परसवणार आहे. यामुळे राज्यात रेल्वेचा प्रवास अधिक सुलभ आणि गतीने होणार आहे.

सध्या पुणे स्टेशनवरुन ६० रेल्वे गाड्या धावत आहेत. या गाड्या दक्षिण आणि उत्तर भारतातील लांब पल्ल्याचा प्रवास करतात. मात्र, आता प्रवाशांची वाढती संख्या यामुळे सर्व सुविधांवर ताण पडत आहे. परिणाम रेल्वे आणि प्रवाशांचे नुकसान होत आहे. यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

पाच वर्षात रेल्वेची संख्या दुप्पट करणार

याच पार्श्वभूमीवर पुढच्या पाच वर्षात रेल्वे गाड्यांची संख्या दुप्पटीने वाढ करणार आहे. याचसोबत सहा फलाटांचा विस्तार करणार आहे. यामध्ये पुणे स्टेशन, हडपसर, खडकी, आळंदी, उरुळीकांचन, फुरसुंगी या स्थानकांचे विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. यातील हडपसर आणि खडकी स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

Railway Expansion
Pune Politics: त्यांना असा धोबीपछाड देणार की..., ऐनेवेळी ४२ विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, इच्छुकांकडून भाजपला थेट इशार

पुण्यातील स्थानकांचा विस्तार

पुणे स्थानकांचा विस्तार करताना पायाभूत सुविधांवर काम केले जाणार आहे. जेणेकरुन प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये. पुण्यातील सहा स्थानकांचा विस्तार होणार आहे. याचसोबत १२ फलाटांचा समावेश आहे. त्यामुळे ता पुण्यातून एकूण ११० गाड्या धावणार आहे. पुढच्या वर्षात संपूर्ण काम पूर्ण असल्याचे मानस रेल्वे प्रशासनाचा आहे. पुणे-सातारा लोहमार्गावरील उरुळी, फुरसुंगी येथे मेगा कोचिंग टर्मिनल उभारले जाणार आहे. यामुळे व्यापार, कृषी, शैक्षणिक कामांसाठी येणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे.

Railway Expansion
Pune Politics: त्यांना असा धोबीपछाड देणार की..., ऐनेवेळी ४२ विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, इच्छुकांकडून भाजपला थेट इशार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com