Pune Politics: त्यांना असा धोबीपछाड देणार की..., ऐनेवेळी ४२ विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, इच्छुकांकडून भाजपला थेट इशार

Pune Municipal Corporation Election: पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. भाजपने ४२ विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापले. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत थेट भाजपलाच इशारा दिला.
Pune Politics: त्यांना असा धोबीपछाड देणार की..., ऐनेवेळी ४२ विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, इच्छुकांकडून भाजपला थेट इशार
Pune Municipal Corporation Election:Saam Tv
Published On

Summary -

  • पुण्यात भाजपकडून ४२ विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापले

  • तिकीट नाकारल्याने अनेकांनी बंडखोरी करत पक्षांतर केले

  • अमोल बालवडकर, किरण बारटक्के यांनी नाराजी व्यक्त करत भाजपला इशारा दिला

  • भाजपसमोर पुण्यात मोठे राजकीय आव्हान

सागर आव्हाड, पुणे

पुणे महानगर पालिका निवडणुकीदरम्यान जागा वाटपावरून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात भाजपकडून अनेक विद्यमान नगरसेवकांची तिकीट कापून नव्यांना संधी देण्यात आली. त्यामुळे भाजप पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. त्यामुळे अनेकांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेत दुसऱ्या पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी तिकीट नाकारलेल्या या विद्यमान नगरसेवकांनी भाजपला इशारा देखील दिला.

पुण्यात भाजपने यंदा निम्म्या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. काही आमदार आणि नेत्यांचा मुलांनाही उमेदवारी नाकारली. ४२ विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापलं. तिकीट कापल्यामुळे या सर्व माजी नगरसेवकांनी बंडखोरी केली. यामधील काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. तर काही शिवसेना शिंदेगटात प्रवेश केला आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Pune Politics: त्यांना असा धोबीपछाड देणार की..., ऐनेवेळी ४२ विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, इच्छुकांकडून भाजपला थेट इशार
Pune Politics: पुण्यात शिंदेगटाला मोठं खिंडार, नाराज पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

भाजपने किरण बारटक्के आणि अमोल बालवडकर या दोघांना तिकीट नाकारले. त्यामुळे दोघेही चांगलेच सतंप्त झाले. किरण बारटक्के यांनी भाजपने तिकीट नाकारल्यानंतर सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल करत 'माझे काय चुकले? असा प्रश्न विचारला. प्रामाणिक कार्यकर्त्यांनी राजकारणात येऊ नये त्यांनी सामाजिक कार्यच करावं असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pune Politics: त्यांना असा धोबीपछाड देणार की..., ऐनेवेळी ४२ विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, इच्छुकांकडून भाजपला थेट इशार
Pune Politics: पुण्यात काँग्रेस-शिवसेना अन् मनसे एकत्र निवडणूक लढवणार, जागा वाटपाचा तिढा सुटला; आज होणार घोषणा

तर दुसरीकडे अमोल बालवडकर यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करत बंडखोरी केली. 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पाळला नाही. मी भाजपला आता धोबी पछाड देणार असा निर्धार केला आहे. भाजपने मला कार्यकर्त्याचे नगरसेवक केले. तर उमेदवारी नाकारून भाजपने मला राष्ट्रवादीचा पुण्याचा नेता बनवला आहे. यात माझे नुकसान नाही झाले तर पक्षाचे नुकसान झाले. याचे उत्तर भविष्यात मी भाजपला देईल.' असे बालवडकर यांनी सांगितले.

Pune Politics: त्यांना असा धोबीपछाड देणार की..., ऐनेवेळी ४२ विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, इच्छुकांकडून भाजपला थेट इशार
Pune Politics: पुण्यात मोठा राजकीय भूकंप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली; १० दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश

या विद्यमान नगरसेवकांना पक्षाने नाकारली उमेदवार

१) ऐश्वर्या जाधव

२) मारुती सांगळे

३) आयुब शेख

४) श्वेता गलांडे-खोसे

५) मुक्ता जगताप

६) सुनीता गलांडे

७) संदीप जराड

८) सोनाली लांडगे

९) राजश्री काळे

१०) आदित्य माळवे

११) सुनीता वाडेकर

१२) अर्चना मुसळे

१३) बंडू ढोरे

१४) स्वप्नाली सायकर

१५) ज्योती कळंबकर

१६) अमोल बालवडकर

१७) श्रद्धा प्रभुणे

१८) हर्षाली माथवड

१९) दीपक पोटे

२०) माधुरी सहस्त्रबुद्धे

२१) जयंत भावे

२२) स्वाती लोखंडे

२३) नीलिमा खाडे

२४) ज्योत्स्ना एकबोटे

२५)राजेश येनपुरे

२६) योगेश समेळ

२७) सुलोचना कोंढरे

२८) विजयालक्ष्मी हरियार

२९) आरती कोंढरे

३०) सम्राट थोरात

३१) मनीषा लडकत

३२) संजय घुले

३३) कविता वैरागे

३४) राजश्री शिळीमकर

३५) प्रवीण चोरबोले

३६) सरस्वती शेंडगे

३७) आनंद रिठे

३८) शंकर पवार

३९)वृषाली चौरे

४०) नीता दांगट

४१) राजश्री नवले

४२) दिशा माने

Pune Politics: त्यांना असा धोबीपछाड देणार की..., ऐनेवेळी ४२ विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, इच्छुकांकडून भाजपला थेट इशार
Pune Politics: गुंडाच्या परिवारावर अजितदादा मेहरबान; गुंडांच्या बायका निवडणुकांच्या मैदानात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com