Vande Bharat Train: देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन 'या' मार्गावर धावणार; जाणून घ्या तिकीट दर अन् A1 सुविधा?

Vande Bharat Sleeper Train: भारतीय रेल्वे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यासाठी सज्ज आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मार्गाचा तपशील, तिकिटाची किंमत, वेग आणि प्रीमियम सुविधांची माहिती दिली.
Vande Bharat Sleeper Train:
Railway Minister Ashwini Vaishnaw shares details of India’s first Vande Bharat Sleeper Train during speed trials.saam tv
Published On
Summary
  • देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार

  • रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली अधिकृत माहिती

  • ट्रेनमध्ये A1 दर्जाच्या सुविधा आणि आधुनिक कोच

वंदे भारत ट्रेनची नवी अपग्रेड ट्रेन म्हणजे स्लीपर ट्रेन लवकरच रुळावर धावणार आहे. ही वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी धावणार त्यात काय सुविधा असणार? ट्रेनचं भाडे किती असणार याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलीय. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी वंदे भारत स्लीपर ट्रेनचा एक व्हिडिओ व्हायरल केला होता. हा व्हिडिओ ट्रेनच्या स्पीड ट्रायलचा होता. त्यात ट्रेनचा स्पीड किती आहे, याची माहिती दिली.आज रेल्वे मंत्र्यांनी या स्लीपर ट्रेनमध्ये काय सुविधा असतील, तिकीट दर काय असेन. ही ट्रेन कधी धावणार याची माहिती दिलीय.

Vande Bharat Sleeper Train:
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळालं नववर्षाचं गिफ्ट; लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील, अशी माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिलीय. येत्या १५ ते २० दिवसांत कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होईल. वंदे भारत स्लीपर ट्रेन ही भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या मार्गांसाठी आणि रात्रीच्या प्रवासासाठी डिझाइन केली आहे.

Vande Bharat Sleeper Train:
Vande Bharat sleeper Train: जबरदस्त! वंदे भारत ट्रेनचा १८० किमीचा स्पीड, सुसाट वेगातही पाण्याचा ग्लास राहिला जशास तसा; Water Taste व्हिडिओ व्हायरल

जर तुम्हाला लांब पल्ल्यांचा प्रवास रात्रीचा करायचा असेल तर तुमच्यासाठी ही ट्रेन उत्तम पर्याय आहे. पूर्णपणे वातानुकूलित ट्रेन आहे. अश्विनी वैष्णव यांच्या मते, वंदे भारत स्लीपर ट्रेनचे दोन संच तयार आहेत आणि त्यांनी यशस्वीरित्या चाचणी पूर्ण करण्यात आलीय. प्रत्येक वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये १६ कोच असणार आहेत. यात १३ एसी थ्री-टायर, चार एसी टू-टायर आणि एक एसी फर्स्ट क्लास कोच असणार आहेत.

या ट्रेनमधून एकूण ८२३ प्रवासी प्रवास करतील. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पुढील सहा महिन्यांत आठ नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. वर्षाच्या अखेरपर्यंत यांची संख्या १२ पर्यंत वाढवण्यात येणार आहे.

काय असणार भाडे

कोलकाता-गुवाहाटी मार्गावरील वंदे भारत स्लीपर ट्रेनचे भाडे २,३०० रुपायांपासून सुरू होईल. कोलकाता ते गुवाहाटी, एसी ३-टायरचे भाडे २,३०० रुपये, एसी २-टायरचे भाडे ३,००० आणि एसी १-टायरचे भाडे ३,६०० असणार आहे. गुवाहाटी-हावडा दरम्यानच्या हवाई प्रवासासाठी साधारण ६०००ते ८००० आहे. वाचक मित्रांनो, तुम्हाला माहितीये का? वंदे भारत ट्रेनमध्ये आकारलं जाणारे भाडे हे २,३०० रुपये असलं तरी त्यात तुम्हाला जेवणाची सुविधा पुरवण्यात आलीय. हो, तुम्हाला त्या भाड्यात जेवण सुद्धा दिले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com