RailOne App: रेल्वेचा मोठा निर्णय! यापुढे UTS अ‍ॅपवरुन मासिक पास काढता येणार नाही; पर्याय काय?

Railway Ticket booking From RailOne App: रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला रेलवन अॅपवरुन मासिक पास काढता येणार नाहीये. तुम्हाला रेलवन अॅपवरुन मासिक पास काढावा लागणार आहे.
RailOne
RailOneSaam tv
Published On
Summary

रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

आता UTS अॅपवरुन मासिक पास काढता येणार नाही

RailOne अॅपचा वापर करावा लागणार

भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेने UTS (Unreserved Ticketing System) अॅपमधून रेल्वे मासिक पास काढण्याची सुविधा बंद केली आहे. त्यामुळे तुम्हाला यूटीएसद्वारे मासिक पास काढता येणार नाहीये. आता रेल्वेचा पास करण्यासाठी RailOne अ‍ॅप वापरता येणार आहे. हा नवीन RailOne अ‍ॅप वापरण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. त्यामुळे जर तुमचा पास संपणार असेल तर RailOne अ‍ॅपवरुन तो काढावा.

RailOne
Bharat Taxi App : स्वस्तात मस्त प्रवास! भारत सरकारची पहिली टॅक्सी सेवा सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती

आता ज्या प्रवाशांचे रेल्वेचे पास अजूनही वैध आहेत. तेच प्रवासी हा पास दाखवू शकणार आहे. पुढे भविष्यात नवीन पास काढण्यासाठी रेलवन अॅपचा वापर करण्यास सांगितले आहे. आता जर तुम्ही यूटीएस अॅपवर मासिक पास करण्यासाठी गेला तर रेलवन अॅप वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. पास सुविधा जरी बंद केली असली तरीही तुम्ही यूटीएस अॅपवरुन अनारक्षित तिकिटे बुक करु शकतात.

तिकीट बुकिंगवर मिळणार डिस्काउंट

डिजिटल व्यव्हरांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेने अजून एक उपक्रम सुरु केला आहे. RailOne अ‍ॅपद्वारे अनारक्षित तिकीट बुक केले तर तुम्हाला ३ टक्के डिस्काउंट मिळणार आहे. डिजिट पेमेंट केल्यावर ही सूट मिळणार आहे. ही सूट १४ जानेवारी ते १४ जुलै या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे. या निर्णयानुसार यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे पेमेंट केल्यावर तुम्हाला सवलत मिळणार आहे.

RailOne
Railway Fire : धावत्या ट्रेनला भीषण आग, २ डबे जळून खाक; एकाचा मृत्यू तर अनेक जण होरपळले; थरारक VIDEO समोर

RailOne अॅपचा वापर

RailOne अ‍ॅप तुम्ही अँड्रॉइड आणि iOS वरुन डाउनलोड करु शकतात. या अॅपद्वारे तुम्ही मासिक पास, आरक्षित, अनारक्षित तिकीट बुक करु शकतात. याचसोबत लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये जेवणाची ऑर्डर, ट्रेन ट्रॅकिंग करु शकतात. त्यामुळे यूटीएस अॅपरुन रेलवन अॅपवर स्विच करण्याचा सल्ला दिला जात आहे. या अॅपवर तुम्हाला रजिस्टर करुन लॉग इन करायचे आहे.

RailOne
Central Railway: बदलापूर ते कर्जतदरम्यान दोन नव्या रेल्वे मार्गिका; रेल्वे मंत्रालयाने दिला ग्रीन सिग्नल; काम कधीपर्यंत पूर्ण होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com