Railway Fire : धावत्या ट्रेनला भीषण आग, २ डबे जळून खाक; एकाचा मृत्यू तर अनेक जण होरपळले; थरारक VIDEO समोर

Andhra Pradesh Tatanagar Ernakulam Train Fire : आंध्र प्रदेशातील एलामंचिली रेल्वे स्थानकाजवळ टाटानगर ते एर्नाकुलम जाणाऱ्या ट्रेनच्या बी१ आणि बी२ कोचमध्ये भीषण आग लागली. दुर्घटनेत प्रवाशाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी असल्याची माहिती आहे.
Railway Fire : धावत्या ट्रेनला भीषण आग, २ डबे जळून खाक; एकाचा मृत्यू तर अनेक जण होरपळले; थरारक VIDEO समोर
Andhra Pradesh Tatanagar Ernakulam Train FireSaam Tv
Published On
Summary
  • टाटानगर ते एर्नाकुलम ट्रेनमध्ये आग

  • एलामंचिली स्टेशनजवळ बी१–बी२ कोचमध्ये भीषण आग

  • लोको पायलटच्या सतर्कतेने ट्रेन तातडीने थांबवली

  • चंद्रशेखर सुंदरम या प्रवाशाचा मृत्यू; काही प्रवासी जखमी

  • आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट; रेल्वे प्रशासन तपास करत आहे

आंध्र प्रदेश मधून मोठी बातमी समोर आली आहे. टाटानगर ते एर्नाकुलम या १५८ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या २ रेल्वेच्या डब्ब्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. आग इतकी प्रचंड होती की, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १२:४५ वाजता टाटानगर ते एर्नाकुलम ही रेल्वे राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील टाटानगरहून केरळच्या एर्नाकुलमला जात असताना, एलामंचिली रेल्वे स्थानकाजवळ अचानक दोन डब्ब्यांमध्ये आग लागली. आग बी१ कोचमध्ये लागली असताना आगीचे लोळ बी२ कोचपर्यंत पसरले आणि मोठा भडका उडाला. आग लागल्याचे समजताच लोको पायलटने ताबडतोब ट्रेन थांबवली. बहुतेक प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. बी१ कोचमध्ये ८२ आणि बी२ डब्यात ७६ प्रवासी होते.

Railway Fire : धावत्या ट्रेनला भीषण आग, २ डबे जळून खाक; एकाचा मृत्यू तर अनेक जण होरपळले; थरारक VIDEO समोर
Kalyan : ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं! शिवसेना-मनसे केडीएमसीत किती लढणार? अधिकृत आकडा समोर

घटनेची माहिती मिळताच रेल्वे रिकामी करण्यात आली तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव चंद्रशेखर सुंदरम असे आहे. तर अनेकजण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र ही आग का लागली? कशामुळे लागली हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. रेल्वे प्रशासन याचा शोध घेत आहे.

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर तत्काळ आवश्यक खबरदारीचे उपाय राबवण्यात आले. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. आगीत कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याची माहिती सध्या समोर आलेली नाही. दरम्यान, प्रवाशांना व त्यांच्या नातेवाईकांना माहिती मिळावी यासाठी विविध रेल्वे स्थानकांवर हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत.

Railway Fire : धावत्या ट्रेनला भीषण आग, २ डबे जळून खाक; एकाचा मृत्यू तर अनेक जण होरपळले; थरारक VIDEO समोर
Pune : पुण्यातील नामांकित पबमध्ये पोलिसांची धाड! नववर्षाच्या बेकायदा पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ५२ जणांवर गुन्हा दाखल

संबंधित हेल्पलाईन क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत :

  • एलामांचिली : 7815909386

  • अनकापल्ली : 7569305669

  • तुनी : 7815909479

  • समालकोट : 7382629990

  • राजमुंद्री : 088-32420541 / 088-32420543

  • एलुरू : 7569305268

  • विजयवाडा : 0866-2575167

Railway Fire : धावत्या ट्रेनला भीषण आग, २ डबे जळून खाक; एकाचा मृत्यू तर अनेक जण होरपळले; थरारक VIDEO समोर
Weather Update : मुंबईसह राज्यात तापमानाचा पारा घसरला, पावसाप्रमाणे थंडीचाही मुक्काम वाढणार; आज कुठे कसं हवामान?

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत हेल्पलाईन क्रमांकांवरच संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. घटनेच्या कारणांचा तपास सुरू असून पुढील माहिती रेल्वेकडून लवकरच देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com