Train Ticket Discount : रेल्वेची नवी सुविधा! आजारी रुग्णांसह नातेवाईकांना मिळणार तिकीटाच्या दरात विशेष सवलत, कसे जाणून घ्या

Indian Railway Scheme : रेल्वेच्या नियमांनुसार काही आजारांच्या रुग्णांसाठी रेल्वे भाड्यात सूट देण्याची तरतूद आहे.
Train Ticket Discount
Train Ticket DiscountSaam tv
Published On: 

Indian Railway New Rule :

भारतीय रेल्वे विभाग हा एक महत्त्वपूर्ण विभाग आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा व सुखकर होण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. तसेच रेल्वे अनेक प्रकारच्या सोयी सुविधाही पुरवते. यामध्ये सीनियर सिटीजन आणि दिव्यांग व्यक्तींना रेल्वेच्या तिकीट दरांमध्ये सूट देत असते.

भारतीय रेल्वे प्रवाशांना प्रवासात चांगल्या सुविधा पुरवत असते. फर्स्ट एसी ते जनरल डब्यापर्यंत प्रत्येक वर्ग आपापल्या परीने प्रवास करू शकतो. यासोबतच काही विशेष गरजूंनाही रेल्वे भाड्यात सूट देण्यात आली आहे. केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच नाही तर काही रुग्णांनाही भाड्यात सूट दिली जाते. रेल्वेच्या नियमांनुसार काही आजारांच्या रुग्णांसाठी रेल्वे भाड्यात सूट देण्याची तरतूद आहे.

Train Ticket Discount
Indian Railway Rules: गणपतीत कोकणात जायचा प्लान करताय? लोअर बर्थ सीट कशी मिळेल? जाणून घ्या रेल्वेचा नियम

अशावेळी जर रेल्वेच्या (Railway) या नियमामध्ये तुमच्या घरातील आजारी व्यक्ती असेल तर त्यांना तिकीटाच्या दरात विशेष सूट (Discount) मिळणार आहे. यामध्ये रेल्वेने कोणते आजार कव्हर केले आहेत व भाड्यात किती सूट मिळू शकते जाणून घेऊया त्याबद्दल

कॅन्सरचे रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीला भाडे माफ होऊ शकते. अशा परिस्थितीत, रुग्णाला फर्स्ट एसी कार, फर्स्ट क्लास, सेकंड क्लासमध्ये 75% सूट मिळते. याशिवाय स्लीपर आणि एसी-3 टियरमध्ये 100 टक्के सूट आहे. फर्स्ट एसी आणि एसी-2 टियरमध्ये 50% सूट उपलब्ध आहे. बस अटेंडंटना स्लीपर आणि AC-3 सीटवर 75 टक्के सूट मिळते.

Train Ticket Discount
Indian Railway Medical Scheme: घाबरु नका, प्रवास करताना अचानक ट्रेनमध्ये तब्येत बिघडली? या ५० रेल्वे स्टेशनवर मिळतील स्वस्तात औषधे

थॅलेसेमियाचे रुग्ण आणि त्यांच्यासोबत प्रवास (Travel) करणाऱ्यांना सूट मिळते. याशिवाय हार्टचे ऑपरेशनसाठी जाणारा रुग्ण व नातेवाईक, इतर ऑपरेशन व डायलिसिसाठी जाणारे मूत्रपिंड रुग्ण यांनाही सूट मिळते. या रुग्णांना सेकंड, स्लीपर, फर्स्ट क्लास, एसी-3 टायर, एसी चेअर कार, फर्स्ट आणि एसी-2 टायरमध्ये 50 टक्के सवलत मिळते.

क्षयरोगाचे रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेले नातेवाईक यांना सेकेंड स्लीपर आणि प्रथम श्रेणीमध्ये ७५ टक्के सवलत मिळते. नातेवाईकांनाही तेवढीच सूट मिळेल. उपचारासाठी किंवा तपासणीसाठी जाणाऱ्या एड्स रुग्णांना द्वितीय श्रेणीमध्ये ५०% सवलत दिली जाते. अॅनिमियाच्या रुग्णांना स्लीपर, एसी चेअर कार, एसी-३ टायर आणि एसी-२ टायरमध्ये ५०% सूट मिळते.

Train Ticket Discount
Good Habits In Children : मुलांना लहानपणापासूनच या ९ चांगल्या सवयी लावा, लोक म्हणतील वाह!

उपचारासाठी किंवा तपासणीसाठी जाणारे हिमोफिलियाचे रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेले नातेवाईकांना भाड्यातून सूट देण्यात आली आहे. या लोकांना सेकंड, स्लीपर, फर्स्ट क्लास, एसी-3 टायर, एसी चेअर कारमध्ये 75 टक्के सूट मिळते. त्याचबरोबर संसर्ग नसलेल्या कुष्ठरुग्णांना भाड्यातही सूट मिळते. अशा रुग्णांना द्वितीय, स्लीपर आणि प्रथम श्रेणीमध्ये ७५ टक्के सवलत दिली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com