कोमल दामुद्रे
सकाळी झोपेतून लवकर उठण्याची सवय मुलांना लहानपणापासूनच लावावी. त्यामुळं सर्व कामे वेळेत करण्यास शिकतील आणि ते आयुष्यात यशस्वी होऊ शकतील.
घरातील लहान-मोठी कामं करण्याची मुलांना सवय लावा. सकाळी झोपेतून उठल्यानंतर अंथरूण जुळून ठेवणं किंवा घेतलेल्या वस्तू होत्या त्याच ठिकाणी ठेवणे इत्यादी. त्याने मुलांना चांगली सवयही लागते आणि त्यांच्यात आत्मविश्वासही वाढतो.
आपल्याकडे जे काही आहे, जे दिलंय त्याबद्दल देवाचे आभार मानले पाहिजेत. पूजा-अर्चा आदी चांगल्या सवयी लावाव्यात. त्यातून नम्रपणा आणि आदराची भावना निर्माण होण्यास मदत होते.
मुलांमध्ये आदर-सन्मानाची भावना निर्माण करणे. शाळेत जाताना आईवडिलांच्या पाया पडणे, कुणी घरी आलं तर, त्यांना नमस्कार करणे अशा सवयी मुलांना लावायला हव्यात.
चांगल्या आरोग्याचं महत्व मुलांना लहानपणापासूनच सांगायला हवं. सकाळी झोपेतून उठल्यानंतर कोमट पाणी प्यायची सवय लावावी. जेणेकरून शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. दिवसभर मुलं उत्साहित राहतात.
मुलांना मोबाइलपासून दूर ठेवावे. मैत्री करणे, इतरांशी गप्पा मारणे आदी सवयी लावाव्यात. त्यासाठी मुलांना घराबाहेर किंवा पार्कमध्ये मित्रांसोबत खेळायला पाठवणे किंवा घेऊन जावे.
योगासने आणि व्यायाम करण्याची सवय मुलांमध्ये लावावी.
मुलांना वेळेचे महत्व सांगावे. ब्रेकफास्टपासून रात्री झोपेपर्यंत त्यांना वेळापत्रकानुसार कामे करण्याची सवय लावावी.
योग्य आहार आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे हे त्यांना पटवून द्यावे.