

रेल्वेने तत्काळ (Tatkal) तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. १ ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवीन टोकन प्रणाली लागू केली जाणार आहे. या बदलामुळे तिकीट काउंटवरील गर्दी कमी व्हायला खूप मदत होईल आणि प्रवाशांना सतत काउंटवर जाण्याची गरज लागणार नाही.
नव्या नियमांनुसार, AC तत्काळ तिकिटांसाठी सकाळी ८.३० ते ९ या वेळेमध्ये टोकन दिले जाणार आहेत. तर नॉन-एसी (स्लीपर) तत्काळ तिकिटांसाठी सकाळी ९.०० ते ९.३० या वेळेत टोकन वाटप केलं जाईल. त्यामुळे बुकिंग सुरू होण्याआधी प्रवाशांना आपला क्रमांक मिळेल.
रेल्वेने प्रत्येक आरक्षण काउंटसाठी टोकनची मर्यादाही ठरवलेली आहे. प्रत्येक काउंटवर एसी तत्काळ तिकिटांसाठी १० टोकन आणि नॉन एसी तत्काळ तिकीटांसाठी १५ टोकन दिले जाणार आहेत. याशिवाय स्वत:साठी किंवा कुटुंबातल्या सदस्यांसाठी तत्काळ तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना प्राधान्य दिलं जाईल.
गरज असल्यास कुटुंबाशी नातं सिद्ध करणारा वैध पुरावाही दाखवावा लागू शकतो. त्यानंतर इतर प्रवाशांची बुकिंग केली जाईल. या नवीन टोकन प्रणालीमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. याआधी टोकन घेण्यासाठी आणि नंतर तिकीट बुक करण्यासाठी दोन वेळा आरक्षण काउंटवर जावं लागत होतं.
आता टोकन आधीच मिळाल्यामुळे वेळेची बचत होईल आणि काउंटवरील गर्दीही कमी होईल. तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आरक्षण काउंटवर जाताना आधार कार्ड किंवा इतर कोणतेही वैध फोटो ओळखपत्र सोबत ठेवा. तसेच प्रवाशांची नावे, वय आणि प्रवासाची माहिती आधीच तयार ठेवल्यावर तिकीट बुकिंगची प्रोसेस जास्त जलद होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.