EPFO Pension Rules: PF काढताना किती TDS कापला जातो? प्रत्येक कर्मचाऱ्याने जाणून घ्यावेत हे नियम

EPF Withdrawal Tax Rules 2026 : EPF काढताना ५ वर्षांचा नियम TDS , Form १२१, टॅक्स फ्री, ITR, ५०००० रुपये मर्यादा यासंदर्भातील आणि EPF योजना २०२६ मधील नवीन नियम जाणून घ्या.
EPF Withdrawal Tax Rules 2026
EPF Withdrawal Tax Rules 2026google
Published On

नोकरी करणाऱ्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना वाटत की, पीएम (EPF) काढताना जर TDS कापला गेला नाही, तर ती संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री असते. पण हा समज पूर्णपणे बरोबर नाही. टॅक्स तज्ज्ञांच्या मते, TDS कापला जात नसेल आणि प्रत्यक्ष कर लागू न होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अंतिम कर किती भरायचा हे आयकर रिटर्न (ITR) भरताना ठरते.

जर एखाद्या कर्मचाऱ्याने सलग ५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण केली असेल, तर सामान्यत: त्याची EPF मधली रक्कम काढताना कोणताही कर लागत नाही.सलग सेवा म्हणजे एकाच कंपनीत ५ वर्षे काम करणं गरजेचं नाही. नोकरी बदलल्यानंतर जुन्या कंपनीतला EPF नवीन कंपनीच्या खात्यात ट्रान्सफर केल्याने आधीची सेवा सुद्धा सलग सेवेत धरली जाते. त्यामुळे एकूण ५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर EPF काढताना टॅक्स फ्री लाभ मिळतो.

EPF Withdrawal Tax Rules 2026
8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारात किती वाढ होणार? 8व्या वेतन आयोगाबाबत 5 महत्त्वाचे अपडेट समोर

मात्र ५ वर्षांआधी EPF काढल्यावर ती रक्कम बऱ्याच वेळा कपपात्र ठरते. अशावेळेस ५०,००० रुपयांपर्यंतच्या रकमेवर TDS कापला जात नाही. पण याचा अर्थ ती रक्कम करमुक्त आहे असं नाही. ITR भरतना एकूण उत्पन्नानुसार कर लागू होऊ शकतो. जर ५ वर्षांआधी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढली आणि पॅन कार्ड अपडेट असेल तर १० टक्के TDS कापला जातो. पॅन कार्ड नसेल तर जास्त किंमतीने TDS आकारला जाऊ शकतो.

EPF Withdrawal Tax Rules 2026
Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर बदलले, पाहा स्वस्त झालं की महागलं? 18, 22 आणि 24 कॅरेटचा आजचा भाव

काही विशेष परिस्थितींमध्ये ५ वर्ष पूर्ण न करताही सूट दिली जाऊ शकते. गंभीर आजारामुळे नोकरी सोडावी लागल्याने, कंपनी बंद झाल्यावर किंवा कर्मचाऱ्याच्या नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे सेवा संपल्यावर EPF काढण्यावर कर लागू होत नाही. तसेच कलम ८०C अंतर्गत घेतलेल्या करसवलतीचाही पुनर्विचार केला जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com