8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारात किती वाढ होणार? 8व्या वेतन आयोगाबाबत 5 महत्त्वाचे अपडेट समोर

Central Government Employees : आठव्या वेतन आयोग हे सॅलरी आणि भत्यांबद्दल महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचला आहे. फिटमेंट फॅक्टर, कर्माचारी संघटनांच्या मागण्या आणि २०२७ मधली संभाव्य वेतनवाढीबद्दल जाणून घ्या मोठे अपडेट.
8th Pay Commission
8th Pay Commissionmeta ai
Published On

बऱ्याच दिवसांपासून आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये सुरू आहे. आता आयोगाचे काम महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचलं आहे. सॅलरी, पेन्शन, भत्ता आणि इतर सुविधांची माहिती घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या आयोगाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जातायेत. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ३ नोव्हेंबर २०५ रोजी या आयोगाची अधिकृत स्थापना झाली होती. आयोगाला आपल्या शिफारसी मांडण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे. तसेच ऑगस्ट २०२६ पर्यंत या कालावधईपैकी निम्मा वेळ पूर्ण होणार आहे.

आठव्या वेतन आयोगाने गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरातल्या कर्मचारी संघटना, पेन्शनधारक संघटना तसेच विविध कर्मचाऱ्यांसोबत चर्चा आणि बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून कर्मचारी संघटनांकडून मेमोरँडम स्वीकारले गेले असून त्यावरच्या सूचना आणि मागण्यांचा अभ्यास सुरू आहे.

8th Pay Commission
Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर बदलले, पाहा स्वस्त झालं की महागलं? 18, 22 आणि 24 कॅरेटचा आजचा भाव

आठव्या वेतना आयोगाच्या कामातला महत्त्वाचा टप्पाही आता स्पष्ट झाला आहे. १६ जानेवारी २०२५ रोजी केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची स्थापना केली होती. त्यानंतर २८ ऑक्टोबर २०२५ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने आयोगाच्या कार्यअटींना मंजुरी दिली. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोगाची अधिकृत स्थापना झाली.

8th Pay Commission
Water Bottle Smell : रोज धुवूनही पाण्याच्या बाटलीतून दुर्गंधी येते? 'ही' सवय बदलली तर समस्या दूर होईल

तसेच, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचं सर्वात जास्त लक्ष फिटेमंट फॅक्टरकडे लागलं आहे. वेतनवाढ ठरवताना फिटमेंट फॅक्टर खूप महत्त्वाचा भाग असतो. सहाव्या वेतन आयोगात हा फॅक्टर १.८६ होता. तर सातव्या वेतन आयोगात तो २.५७ करण्यात आलेला होता. यंदा BPMS आणि NC-JCM सारख्या कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर ३.५ किंवा त्यापेक्षा जास्त ठेवण्याची मागणी केली आहे. मात्र आयोग सर्व आर्थिक बाबी, कर्मचारी संघटनांच्या सूचना आणि सरकारची आर्थिक परिस्थिती यांचा सखोल विचार करून हा निर्णय घेणार आहे.

सध्या आयोगाकडून विविध स्तरांवर माहिती संकलन आणि चर्चेची प्रक्रिया सुरू असून, २०२६ च्या मध्यापर्यंत अंतिम शिफारशी केंद्र सरकारकडे सादर केल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयोगाच्या शिफारशीनंतर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या सॅलरीत, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com