Trump Tariffs: रशियाशी दोस्ती खटकली, डोनाल्ड ट्रम्प यांची सटकली; अमेरिका भारताच्या वस्तूंवर लावणार 25 टक्के टॅरिफ

Donald Trump imposes 25% import tax on Indian goods: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. भारत अमेरिकेचा मित्र आहे, पण त्यावर २५ टक्के कर आकारला जाईल, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
 India-US trade deal
Donald Trump announces 25% import duty on Indian goodsSaamtv
Published On
Summary
  • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या वस्तूंवर २५% आयात कर लावण्याची घोषणा केली.

  • त्यांनी भारताला 'मित्र देश' म्हटलं असलं तरी व्यापार धोरणामध्ये कठोर पावले उचलली.

  • या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • भारतातील निर्यातदारांना या कराचा आर्थिक फटका बसू शकतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. भारत अमेरिकेचा मित्र असला तरी त्यावर २५ टक्के कर लावला जाईल. यासोबतच, रशियन लष्करी उपकरणे आणि तेल खरेदी करण्यासाठी दंडही लावला जाईल, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत. भारतावर टॅरिफ लावत असल्याची घोषणा करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी देणारी भाषा केली. दरम्यान भारत आणि रशियाच्या मैत्री अमेरिकाला खटकलीय. भारत गेल्या काही दिवसांपासून रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करत होता. त्यामुळे अमेरिकेनं भारतावर २५ टक्के टॅरिफ लावलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com