PM Modi: अमेरिकेतून रात्रीच्यावेळी कॉल आला अन्...; PM मोदींनी लोकसभेत सांगितली Operation Sindoor ची कहाणी

PM Modi Speech Loksabha On Operation Sindoor : लोकसभेतील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरची महत्त्वाची माहिती दिली. यात भारताने दहशतवादी तळांना कसे निष्प्रभ केले आणि पाकिस्तानच्या नियोजित क्षेपणास्त्र हल्ल्याला कसे कडक प्रत्युत्तर दिले याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.
PM Modi
PM Modi Speech Loksabha On Operation Sindoorsaam tv
Published On
Summary
  • ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारताने दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले.

  • अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी पाकिस्तान हल्ल्याचा इशारा दिला होता.

  • मोदींनी सांगितले, गोळीला गोळीने उत्तर दिले जाईल.

  • पाकिस्तानने १००० मिसाईल्ससह मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

लोकसभेत ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारची भूमिका मांडली. ऑपरेशन सिंदूरचा उद्देश दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करणे हा त्यामुळे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर आम्ही आमच्या स्वतःच्या अटींवर युद्धबंदी केली, असं पंतप्रधान मोदींनी लोकसभेत सांगितलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी ९ मे च्या रात्री काय घडलं याची माहिती दिली.

अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी फोन करून पाकिस्तान एक मोठा हल्ला करणार असल्याची माहिती दिली होती, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत. दरम्यान जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितले नाही. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी ९ मे च्या रात्री मला नक्कीच फोन केला होता. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींना ९ मेच्या रात्री मला फोन करत होते. त्यावेळी मी सैनिकांसोबत मिटिंगमध्ये होतो.

त्यावेळी त्यांनी परत एकदा त्यांनी फोन केला. तेव्हा उपराष्ट्रपतींनी सांगितलं की, पाकिस्तान मोठा हल्ला करणार आहे. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, पाकिस्तान मोठा हल्ला करेल तर आम्ही त्यापेक्षा मोठा हल्ला करू. गोळीला गोळीने उत्तर देऊ. त्या ९ आणि १० मेला आम्ही पाकिस्तानच्या सैन्याची ताकद कमी केली. पाकिस्तान जवळजवळ १००० मिसाईल्स आणि ड्रोन्सच्या मदतीने भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्नात होता.

PM Modi
पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

या मिसाईल्स भारताच्या कोणत्याही भागावर पडल्या असत्या तर तिथे विध्वंस झाला असता. पण या १००० मिसाईल्स आणि ड्रोन्सला भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने आकाशात हाणून पाडले, असंही मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं. पाकिस्तानने आदमपूर एअरबेसवर हल्ला झाल्याची खोटी माहिती पसवली. पण मी दुसऱ्या दिवशीच आदमपूरला गेलो आणि पाकिस्तानचं खोटं उघडं पाडलं, असेही मोदी म्हणाले.

PM Modi
Narendra Modi : सैन्याच्या पराक्रमाला काँग्रेसचं समर्थन नाही हे दुर्भाग्य; PM मोदींच्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक, VIDEO

आमच्यावर एवढा मोठा हल्ला होईल, असा पाकिस्तानने कधीच विचार केला नव्हता. तेव्हा पाकिस्तानने भारताच्या डीजीएमओला फोन करून विनंती केली होती. हे बंद करा. बरंच मारलं. आता अधिक मार खाण्याची आमच्यात ताकद नाही. प्लीज हल्ला रोखा, असं पाकिस्तानचा डीजीएमएकडून आम्हाला विनंती करण्यात आली, असे मोदींनी संसदेत सांगितले.

भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं तेव्हाच सांगितलं होतं की, आम्ही आमचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. परत असं कराल तर महागात पडेल. आमची अॅक्सन नॉन एक्सेलेटरी आहे, हे आम्ही आधीच सांगितलं होतं. त्यामुळेच आम्ही हा हल्ला रोखला,असं मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com