
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
ऑपरेशन महादेव अंतर्गत भारतीय सैन्य, सीआरपीएफ व पोलिसांनी ही कारवाई केली.
अमित शहा यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
हल्ला रोखण्यात आल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत यासंदर्भात माहिती दिली. ऑपरेशन महादेवअंतर्गत भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी तिन्ही दहशतवाद्यांना ठार मारले. ऑपरेशन सिंदूरवर कालपासून लोकसभेत चर्चा सुरू आहे. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती दिली.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, कालच्या कारवाईत सुलेमान, अफगान आणि जिब्रान या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांना अन्न पुरवणाऱ्या लोकांना आधीच ताब्यात घेण्यात आलं होतं. या दहशतवाद्यांचे मृतदेह श्रीनगरला आणल्यानंतर, ताब्यात घेतलेल्या लोकांनी हे दशतवादी पहलगाम हल्ल्यात सहभागी असल्याची माहिती दिली.
सभागृहात चर्चा करताना अमित शहा म्हणाले, सुलेमान उर्फ फैसल आणि अफगान हे लष्कर - ए- तैयबाचे एका श्रेणीचे कमांडर होते. याशिवाय जिब्रान देखील दहशतवादी होता. बैसरन खौऱ्यात निष्पाप लोकांना ठार करण्यात आलं. त्या तिन्ही दहशतवाद्यांना संपवण्यात आलं आहे, असं शहा म्हणाले.
'तीन दहशतवाद्यांचे मृतदेह श्रीनगरमध्ये दाखल होताच सर्वांनी त्यांची ओळख पटवली. तसेच दहशतवादी हल्ल्याचा एफएसएल अहवाल देखील तयार केला होता. दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर, त्यांच्या रायफलमधील गोळे एफएसएल अहवालाशी जुळत होते. चंदीगढमध्ये झालेल्या तपासानंतर हे सिद्ध झाले आहे', असंही अमित शहा म्हणाले.
नरेंद्र मोदींनी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले
'पहलगाम हल्ल्यानंतर मी त्याच दिवशी श्रीनगरला गेलो होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २३-२४ एप्रिल रोजी सीसीएस बैठक घेतली होती. यात सिंधू नदीचा करार पुढे ढकलण्यात आला होता. तसेच दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनाही योग्य उत्तर दिले जाईल, असं ठरवण्यात आलं होतं. दरम्यान, ३० एप्रिल रोजी मोदींनी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर पार पडलं. यात ९ दहशतवादी अड्डे नष्ट करण्यात आलं', अशी माहिती अमित शहा यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.