IAS Himanshu Gupta: अपयश म्हणजे अंत नाही, परिस्थितीवर मात केली अन् चहावाल्याचा मुलगा IAS अधिकारी झाला; वाचा संघर्षमय कहाणी

IAS Himanshu Gupta Success Story: मेहनत आणि अभ्यास करुन कोणताही व्यक्ती आयुष्यात खूप यशस्वी होऊ शकतो.असंच यश आयएएस ऑफिसर हिमांशु गुप्ता यांनी मिळवलं आहे.
IAS Himanshu Gupta
IAS Himanshu GuptaSaam Tv
Published On

जर तुम्ही कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी मनापासून मेहनत केली आणि तुमच्या कामात सातत्य ठेवलं तर तुम्हाला यश हे मिळतंच. देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे यूपीएससी. यूपीएससी परीक्षा देऊन अधिकारी पदावर काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु यूपीएससी परीक्षा देणे हे खूप मोठं आव्हान आहे. हेच आव्हान देशातील आयएएस हिमांशु गुप्ता यांनी स्विकारलं आणि ते पेलवलं. हिमांशु गुप्ता यांनी खूप गरीब परिस्थितीत दिवस काढले आहेत. (IAS Himanshu Gupta)

IAS Himanshu Gupta
IAS Smita Sabharwal:फक्त २३ व्या वर्षी IAS ऑफिसर, कोण आहेत स्मिता सभरबाल? जाणून घ्या

हिमांशु गुप्ता हे देशात आयएएस (IAS)म्हणून कार्यरत आहे. हिमांशु गुप्ता यांचे वडिल मजूर होते. त्याचसोबत त्यांचा चहाचा स्टॉल होता. हिमांशु गुप्ता यांनी खूप गरीबीतून दिवस काढले. ते रोज शाळेत जाण्यासाठी ७० किमी प्रवास करायचे. हिमांशु गुप्ता मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांचे आईवडिल हे जास्त शिकलेले नव्हते. परंतु त्यांनी कधीच आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणतीही कसर पडून दिली नाही.

हिमांशु गुप्ता यांनी २०१८ साली पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. त्यावेळे त्यांचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवेत सिलेक्शन झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा २०१९ मध्ये परीक्षा दिली. यावेळी त्यांची आयपीएस म्हणून निवड झाली. त्यानंतर २०२० मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांची आयएएस म्हणून निवड झाली. (Himanshu Gupta Success Story)

IAS Himanshu Gupta
IAS Shraddha Gome: लंडनमधील नोकरीला रामराम, UPSC ची तयारी, पहिल्याच प्रयत्नात IAS; श्रद्धा गोमे यांची कहाणी एकदा वाचाच

हिमांशु गुप्ता यांनी खूप खडतर परिस्थितीत जीवन काढले. परंतु आता ते खूप यशस्वी आहेत. हिमांशु हे रोज शाळेसाठी ३५ किलोमीटर प्रवास करुन जायचे. त्यांचे मित्र स्कूल वॅनने जायचे.जेव्हा त्यांची वॅन चहाच्या स्टॉलच्या जवळून जायची तेव्हा ते लपून बसायचे. एकदा त्यांच्या मित्रांनी त्यांना बघितले. त्यानंतर त्यांचे मित्र हिमांशु यांना चहावाला चहावाला असे चिडवू लागले.परंतु त्यांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले.

हिमांशु हे अभ्यासासोबतच वडिलांना त्यांच्या कामात मदत केली.त्यांचे संपूर्ण कुटुंब काम करायचे. रोज ते ४०० रुपये कमवायचे. अशा खडतर परिस्थितीतून त्यांनी खूप मोठे यश मिळवले आहे. (IAS Officer)

IAS Himanshu Gupta
IAS, IPS अधिकाऱ्यांचा पगार किती? कोण घेतं सर्वाधिक मानधन? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com